• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुणे महापालिका बनावट भरती घोटाळ्याने खळबळ; शेकडो बेरोजगार तरुणांची कोट्यवधींची फसवणूक

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

पुणे : प्रतिनिधी

पुणे महानगरपालिकेतील (PMC) बनावट भरतीच्या नावाखाली बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पालिकेत कायमस्वरूपी सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत मोठ्या रॅकेटच्या माध्यमातून शेकडो तरुणांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर, भारती विद्यापीठ आणि पर्वती पोलीस ठाण्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. प्रकरणाशी संबंधित राजेंद्र बबन खेडेकर, नमिता बनसोडे, संजय भालेराव, आनंद लोंढे, शिवानंद पाटील, अमित देशपांडे, अमित दारवटकर यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

याप्रकरणातील शिवानंद पाटील, अमित देशपांडे आणि अमित दारवटकर यांना अटक करण्यात आली असून राजेंद्र बबन खेडेकर आणि नमिता बनसोडे हे फरार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बनावट कागदपत्रांचा वापर

फसवणुकीसाठी आरोपींनी पुणे महानगरपालिकेचा बनावट लोगो, लेटरहेड, ओळखपत्रे, वेतन पावत्या, विभागाचे बनावट शिक्के तसेच वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या वापरल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांना आपली निवड पालिकेच्या नोकरीसाठी झाल्याचा विश्वास निर्माण केला जात होता.

पदानुसार लाखोंची मागणी

आरोपींकडून लिपिक आणि शिपाई पदांपासून कनिष्ठ व वरिष्ठ अभियंता तसेच उपआयुक्त पदांपर्यंत विविध पदांचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. पदानुसार प्रत्येक उमेदवाराकडून ₹१५ लाख ते ₹४५ लाखांपर्यंत रक्कम घेतल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणातील फसवणुकीची व्याप्ती, आर्थिक व्यवहार, आणखी किती तरुणांची फसवणूक झाली आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठीही पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

Previous Post

चेतना नगरमध्ये दुकानदारानेच बुजवला रस्त्यावरील खड्डा

Next Post

जायकवाडी वसाहत परिसरातील धम्मध्वज स्थळी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुलोहा,

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
जायकवाडी वसाहत परिसरातील धम्मध्वज स्थळी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुलोहा,

जायकवाडी वसाहत परिसरातील धम्मध्वज स्थळी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुलोहा,

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In