• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जायकवाडी वसाहत परिसरातील धम्मध्वज स्थळी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुलोहा,

Pratik Tidke by Pratik Tidke
August 14, 2026
in महाराष्ट्र
0
जायकवाडी वसाहत परिसरातील धम्मध्वज स्थळी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरुलोहा,
0
SHARES
67
VIEWS
Ad 1


मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून शहरातील कंधार रोडस्थित जायकवाडी वसाहत परिसरात असलेला पंचशील धम्मध्वज पुनर्स्थापित केल्यानंतर कांहीं भीमसैनिकावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील गुन्हे मागे घेण्यात येऊन सदरील जागा विश्र्वशांती बुद्ध विहाराच्या नावे कायम करण्यात यावी सह इतर मागण्यांसाठी प्रमुख आंदोलक माजी नगरसेवक ॲड. पंचशील कांबळे यांनी पुनर्स्थापित धम्मध्वज स्थळी आमरण उपोषण आरंभ केले असून दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू होते.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …


शहरातील प्रमुख चर्चेत असलेल्या मूळ जायकवाडी वसाहत परिसरात गत तीस ते पस्तीस वर्षांपासून असलेला बौद्ध बांधवांच्या अस्मितेचा व जिव्हाळ्याच्या पंचशील धम्मध्वज भूमाफियांच्या सांगण्यावरून कांहीं मंडळींनी काढला होता. त्याविरुद्ध सकल बौद्ध समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली होती. त्याप्रकरणी २३ जुलै रोजी तहसील कचेरीवर बौद्ध समाजाने भव्य मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रशासनाकडून कसलीही कार्यवाही होत नसल्याचे दिसून आल्याने अखेर तरुण भीमसैनिकांनी जायकवाडी येथे पूर्वी असलेल्या ठिकाणी दि. ८ रोजी पहाटे पंचशील धम्मध्वज पुनर्स्थापित केला.

तर सदर जमीन घेणाऱ्याकडून धम्मध्वज लावल्या प्रकरणी दि. ११ रोजी रात्री उशिरा पाच जणांविरुद्ध लोहा पोलिसात गुन्हा दाखल केला होता. त्यासंदर्भात दि. १३ ऑगस्ट पासून प्रमुख आंदोलक माजी नगरसेवक ॲड. पंचशील कांबळे हे विविध मागण्यांसाठी पुनर्स्थापित धम्मध्वज स्थळी आमरण उपोषणास बसले आहेत. दि. १४ रोजी दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू होते. प्रशासनास दिलेल्या निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या अशा – पाच भीमसैनिकावर करण्यात आलेली कार्यवाही तत्काळ मागे घेण्यात यावी, सन १९९२ पासून अस्तित्वात असलेल्या पंचशील ध्वजाची पूर्ववत त्याच ठिकाणी सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करण्यात यावी, विश्वशांती बुद्ध विहारासाठी नियोजित जागेचे संरक्षण करून पूर्वस्थिती कायम ठेवण्यात यावी, नियमबाह्य पद्धतीने रद्द करण्यात आलेला नमुना क्र. ४७ तात्काळ पूर्ववत करण्यात येऊन संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीविरुद्ध कारवाई करावी, शासकीय नोंदणीमध्ये फेरफार करणे व अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचारी व जागामलक यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात यावी, तहसीलदार यांनी बोलावलेल्या तहसीलदारांच्या दालनात घेण्यात आलेल्या बैठकीस अनुपस्थित संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी तसेच जिल्हास्तरीय किंवा विभागीय वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून सदरील अहवाल सार्वजनिक करण्यात यावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
सदर पंचशील धम्मध्वज स्थळी सातव्या दिवसापर्यंत दैनंदिन शेकडो बौद्ध अनुयायी तसेच आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक संघटनेचे पदाधिकारी भेट देत आहेत.

Tags: Baban jondhale
Previous Post

पुणे महापालिका बनावट भरती घोटाळ्याने खळबळ; शेकडो बेरोजगार तरुणांची कोट्यवधींची फसवणूक

Next Post

नाव्हा गावात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांचे पंचायत समितीला निवेदन

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post

नाव्हा गावात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांचे पंचायत समितीला निवेदन

ताज्या बातम्या

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

माहितीचा अधिकार हा सशक्त लोकशाहीचा आधार; लोणार येथे माहिती अधिकार दिन उत्साहात

September 29, 2026

बाजार समितीतील सदस्यत्व रिक्त घोषित करा; १७ शेतकऱ्यांचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

September 29, 2026

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In