• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा भूमिअभिलेख कार्यालयात उपअधीक्षक पद भरण्यासाठी उपनगराध्यक्षा सौ . माधवी मकरंद पाटील यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in महाराष्ट्र
0
शहादा भूमिअभिलेख कार्यालयात उपअधीक्षक पद भरण्यासाठी उपनगराध्यक्षा सौ . माधवी मकरंद पाटील यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन.
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

शहादा,दि.15(का.प्र.)
शहादा तालुका भूमिअभिलेख कार्यालयात मागील तीन वर्षांपासून उपअधीक्षक हे अत्यंत महत्त्वाचे आणि मुख्य प्रशासकीय पद रिक्त असल्याने नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हे पद त्वरित भरण्यात यावे, अशी आग्रही मागणी शहादा पालिकेच्या उपनगराध्यक्षा सौ.माधवी मकरंद पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
महसूल मंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात सौ.माधवी मकरंद पाटील यांनी नमूद केले आहे की, शहादा तालुका हा नंदुरबार जिल्ह्यातील एक महत्त्वाचा व मोठा तालुका आहे. मात्र, मागील तीन वर्षांपासून भूमिअभिलेख कार्यालयात पूर्णवेळ उपअधीक्षक नसल्यामुळे कार्यालयातील दैनंदिन कामकाज पूर्णपणे मंदावले आहे. या महत्त्वाच्या अधिकाऱ्याच्या अभावामुळे जमिनींच्या मोजणीची प्रकरणे, शेतजमिनींचे वाद, फेरफार नोंदी तसेच अपिलाची प्रकरणे प्रलंबित राहण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

उपअधीक्षकांची स्वाक्षरी आणि मंजुरी आवश्यक असणारी शेकडो कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे शेतकरी, मालमत्ताधारक आणि सर्वसामान्य नागरिकांना आपल्या हक्काच्या कामासाठी कार्यालयाचे वारंवार फेरे मारावे लागत असून त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अभावामुळे प्रशासकीय कामकाजावर योग्य ते नियंत्रण राहिले नसून याचा नाहक फटका सामान्य जनतेला बसत आहे.शहादा भूमिअभिलेख कार्यालयातील ही गंभीर परिस्थिती विचारात घेऊन तेथे त्वरित पूर्णवेळ उपअधीक्षक यांची नियुक्ती करावी किंवा तात्पुरत्या स्वरूपात सक्षम अधिकाऱ्याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी सौ‌.पाटील यांनी निवेदनात केली आहे.दरम्यान, या निवेदनाच्या प्रती जमाबंदी आयुक्त व संचालक भूमिअभिलेख (पुणे), नंदुरबारचे जिल्हाधिकारी, शहादा विधानसभेचे आमदार आणि जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख (नंदुरबार) यांनाही पुढील योग्य त्या कारवाईसाठी पाठवण्यात आल्या आहेत. महसूल मंत्री या विषयाची तातडीने दखल घेऊन शहादावासीयांना दिलासा देतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथे सीड बॉल निर्मिती कार्यशाळा उत्साहात संपन्न.

Next Post

जुन्नरमध्ये आमदारांकडून पत्रकाराला धमकी?

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
जुन्नरमध्ये आमदारांकडून पत्रकाराला धमकी?

जुन्नरमध्ये आमदारांकडून पत्रकाराला धमकी?

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In