• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 29, 2026
in ताज्या घडामोडी
0
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

विविध प्रमाणपत्रांसाठी २५७ अर्ज दाखल; दोनशेहून अधिक नागरिकांनी घेतला शासकीय योजनांचा लाभ

मुंबई | प्रतिनिधी

RelatedPosts

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि तहसील कार्यालय, बोरिवली यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या-विमुक्त जाती-जमातीतील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता अभियानांतर्गत’ विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी बोरिवली पूर्व येथील फुलपाखरू उद्यान परिसरातील विमुक्त भटके जनजाती विकास परिषद अखिल भारतीय संघटनेच्या कार्यालयात हे शिबिर पार पडले.

शिबिरात जात प्रमाणपत्रासाठी ५९, अधिवास प्रमाणपत्रासाठी ३२, आधार कार्डसाठी ६३, शिधापत्रिकेसाठी २६, आयुष्मान भारत कार्डसाठी ३५, संजय गांधी निराधार योजनेसाठी २२ आणि उत्पन्न दाखल्यासाठी २० अर्ज दाखल करण्यात आले. विविध शासकीय योजनांची माहिती घेण्यासाठी दोनशेहून अधिक नागरिकांनी शिबिराला भेट दिली.

शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने नियोजित वेळेनंतरही शासकीय अधिकारी व कर्मचारी नागरिकांची कामे पूर्ण करण्यासाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यरत होते. विविध शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रांची माहिती नागरिकांना यावेळी देण्यात आली.

या शिबिरासाठी पत्रकार भारत कवितके यांना अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी भटके विमुक्त जनजाती विकास परिषद अखिल भारतीय संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीकुमार शिंदे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सहदेव रसाळ, समाजसेवक रामकृष्ण बेलवलकर, चंद्रकांत शिंदे, बबन मोहिते, अनघा चांगले, अर्चना लष्कर, शोभा माने, लहू पवार, चंद्रकांत उबाळे, माने ताई, मल्हारी जी, संदेश भागवत आदी उपस्थित होते.

शिबिरात आलेल्या नागरिकांना आवश्यक सहकार्य करून उपक्रम यशस्वी करण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मुंबई उपनगर संचालक विजय कुडवे, मुंबई शहरचे सहायक संचालक रविकिरण नाईक, नायब तहसीलदार श्री. जांभळे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल संघटनेचे राज्य कार्यवाह गिरीधर साळुंके यांनी शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी भविष्यात मुंबई शहर व उपनगरातील विविध भागांत अशा प्रकारची शिबिरे आयोजित करण्यासाठी सहकार्य केले जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

Tags: Bharat kavitake
Previous Post

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

Next Post

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

Related Posts

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
ताज्या घडामोडी

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
0
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
3
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
16
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
1
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
3
मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
ताज्या घडामोडी

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

September 28, 2026
76
Next Post

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In