जाफ्राबाद : प्रतिनिधी
आज दिनांक १५ ऑगस्ट रोजी GES स्कूल, जाफ्राबाद येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे तसेच देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
यावेळी शाळेची विद्यार्थिनी अन्वी किशोर उबाळे हिने प्रभावी भाषण सादर केले. तिच्या भाषणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.











