• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड व परिसरात भारतीय स्वातंत्र्याच्या 80 वा स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा…..

Pratik Tidke by Pratik Tidke
August 15, 2026
in महाराष्ट्र
0
कुरुंदवाड व परिसरात भारतीय स्वातंत्र्याच्या 80 वा स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा…..
0
SHARES
79
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :दरिकांत कोळेकर.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

कुरुंदवाड :-कुरुंदवाड व परिसरात भारतीय स्वातंत्र्याच्या 80वा स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. 15 ऑगस्ट 2026 रोजी असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या 80 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभारंभ फॉउंडेशन कुरुंदवाड या संस्थेत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संदीप गायकवाड यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा आणि महत्त्वाचा आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांच्या प्रदीर्घ गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यासाठी अनेक देशभक्तांनी आणि क्रांतिकारकांनी क्रांतीची मशाल पेटवून आपल्या प्राणांचे बलिदान दिले. महात्मा गांधी, भगतसिंग , राजगुरू,सुखदेव,
चंद्रशेखर आझाद,सुभाषचंद्र बोस, यासारख्या महान देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्य दिन आपल्याला या वीरांच्या त्यागाची आणि संघर्षाची आठवण करून देतो.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे, जो संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
हा दिवस आपल्याला आपल्या मूलभूत हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देतो. स्वातंत्र्यामुळे भारताने विज्ञान, तंत्रज्ञान आणि आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. आज भारत जगातील एक शक्तिशाली आणि सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे, परंतु या स्वातंत्र्यासोबतच देशाची शांतता आणि सुरक्षा राखण्याची जबाबदारीही आपल्यावर आहे. देशातील गरिबी, निरक्षरता ,बेरोजगारी आणि भ्रष्टाचार नष्ट करणे आवश्यक आहे.

स्वातंत्र्य दिन आपल्याला देशाच्या विकासासाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा घेण्याची संधी देतो. आपल्या सीमेवर अहोरात्र रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हा सण तरुणांमध्ये देशभक्तीची, शिस्तीची आणि देशसेवेची भावना जागृत करतो. प्रत्येक नागरिकाने देशाच्या कायद्याचा, नियमांचा आणि संविधानाचा आदर केला पाहिजे. आपला राष्ट्रीय ध्वज ‘तिरंगा’ हा आपल्या देशाच्या सन्मानाचे आणि अस्मितेचे प्रतीक आहे. या दिवशी आपण सर्वांनी मिळून देशाची अखंडता आणि एकता टिकवून ठेवण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वातंत्र्य ही केवळ एक संकल्पना नसून, ती जबाबदारीने आणि गुण्यागोविंदाने जगण्याची कला आहे. भारताला एक जागतिक महासत्ता बनवण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. ‘जय हिंद’ आणि ‘वंदे मातरम’ च्या घोषणांनी संपूर्ण देश, गाव दुमदुमूनला होता.. पूर्वजांच्या बलिदानातून मिळालेले हे अमूल्य स्वातंत्र्य आपण सदैव टिकवून ठेवले पाहिजे.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गणेश भोई, सचिव दरिकांत कोळेकर, खजिनदार महादेव नरुटे. उत्तम भोई, विलास माळी, सुनीता भोई. सौ आरती खरोसे,अमोल खरोसे,अक्षय रजपूत, शशिकांत कडाळे, तसेच सर्व संचालक, सभासद उपस्थित होते. जेष्ठ नागरिक संघ कुरुंदवाड च्या वतीने कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी शशिकांत पाटील, अध्यक्ष मलापा बाबू प्रधाने, देशपांडे, लंबे, मोहिते सुरेश कांबळे घोरपडे, इत्यादीच्या उपस्थितीत झाला.
तसेच कुरुंदवाड नगरपरिषदेत नगराध्यक्षा मनिषा डांगे व सर्व नगरसेवक तर मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई. सर्व कर्मचारी उपस्थित होते. शाळेत एस पी हायस्कूल कुरुंदवाड, साने गुरुजी विद्यालय. आणि जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा. खाजगी शाळा इत्यादी शाळेत मुख्याध्यापक,शिक्षक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.सकाळी ठीक 9.30वा सामुदायिक झेंडावंदन एस पी हायस्कूल च्या भव्य पटांगणात कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनिषा डांगे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, नगरपरिषदेचे सर्व आजी माजी नगरसेवक नागरिक उपस्थित होते.

Tags: dalikant kolekar
Previous Post

GES स्कूल जाफ्राबाद येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Next Post

सौ विमला देवी खंडेराव माने (रहिमतपूर) कन्या माध्यमिक विद्यालय, कुरुंदवाड येथे मुख्याद्यापिका सौ. सुनिता जोंग यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण ……..

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
सौ विमला देवी खंडेराव माने (रहिमतपूर) कन्या माध्यमिक विद्यालय, कुरुंदवाड येथे मुख्याद्यापिका सौ. सुनिता जोंग यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण ……..

सौ विमला देवी खंडेराव माने (रहिमतपूर) कन्या माध्यमिक विद्यालय, कुरुंदवाड येथे मुख्याद्यापिका सौ. सुनिता जोंग यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण ……..

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In