
सोलापूर : प्रतिनिधी
पुणे येथे आज, २२ ऑगस्ट २०२६ रोजी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या ‘छात्रों की गूँज’ या विशेष कार्यक्रमासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण-तरुणींनी पुण्याकडे प्रस्थान केले.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरची तरुणाई या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाली. विद्यार्थ्यांचे प्रश्न, तरुणाईच्या अपेक्षा आणि नव्या भारताविषयीच्या स्वप्नांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाकडे सोलापूरच्या युवकांचे विशेष लक्ष होते.
कार्यक्रमस्थळी खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत सोलापूरच्या युवक-युवतींनी सेल्फी घेत उत्साह व्यक्त केला. यावेळी विविध घोषणांनी पुण्यातील कार्यक्रमस्थळ परिसर दणाणून गेला.
“देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो”,
“देश का पीएम कैसा हो, राहुल गांधी जैसा हो”,
“छात्रों की गूँज – विद्यार्थ्यांचा आवाज”
अशा घोषणांनी सोलापूरच्या युवकांनी आपला उत्साह व्यक्त केला.
सोलापूरहून मोठ्या संख्येने युवक पुण्यात दाखल झाल्याने कार्यक्रमाला सोलापूरच्या तरुणाईची विशेष उपस्थिती लाभली.
