• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करा; अवैध धंद्यांची माहिती तातडीने द्या : पीआय राहुल सूर्यतळ

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 23, 2026
in Blog
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1
Ad 1

जिवाजीवाडी व तुकुचीवाडीत गावकऱ्यांशी संवाद; पैलवान विद्यार्थ्यांचे केले कौतुक

केज : प्रतिनिधी

केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी जिवाजीवाडी व तुकुचीवाडी येथे गावकऱ्यांसोबत बैठक घेऊन सामाजिक, शैक्षणिक तसेच कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले. गावातील सामाजिक कार्यक्रमांवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खर्च करा, असे आवाहन त्यांनी केले.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

पीआय राहुल सूर्यतळ यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांसारख्या महापुरुषांचा आदर्श घेऊन पुढील पिढी अधिक सुशिक्षित व सक्षम करण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या माध्यमातून मुलांचे भविष्य घडविणे ही पालक आणि समाजाची जबाबदारी असून, विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी यासाठी पालकांनी विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

अवैध धंद्यांबाबत पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन

गावात अवैध दारूविक्री, गुटखा, जुगार किंवा अन्य बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्यास नागरिकांनी घाबरून न जाता पोलिसांशी संपर्क साधावा. अशा प्रकारांची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी तसेच शक्य असल्यास लेखी तक्रार करावी. तक्रारीच्या आधारे नियमानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पीआय सूर्यतळ यांनी स्पष्ट केले.

यावेळी तुकुचीवाडीतील काही महिलांनी गावात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध दारूविक्रीबाबत पीआय सूर्यतळ यांच्याकडे तोंडी तक्रार केली. त्यावर त्यांनी महिलांना सविस्तर माहिती देऊन लेखी तक्रार करण्याचे आवाहन केले.

पैलवान विद्यार्थ्यांचे कौतुक

तुकुचीवाडी येथील काही युवक व विद्यार्थी कुस्ती क्षेत्रात कार्यरत असून, त्यांच्या कामगिरीचे पीआय राहुल सूर्यतळ यांनी कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही प्रगती करून गावाचे नाव उज्ज्वल करावे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जिवाजीवाडी ग्रामपंचायत कार्यालयात गावकऱ्यांच्या वतीने पीआय राहुल सूर्यतळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बीट अंमलदार मुंडे, कागदे व शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच दीपक काळे, माजी सरपंच संजय नाना कुटे, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी चौरे, युवा कार्यकर्ते भागवत चौरे, प्रभाकर चौरे पाटील, राजेभाऊ फुंदे, रमेश चौरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

तुकुचीवाडी येथेही पीआय राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीचे नियोजन पिंटू महाराज चौरे यांच्या नियंत्रणाखाली गावकऱ्यांनी केले. बैठकीत गावातील सामाजिक, शैक्षणिक आणि कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात पुढे गेल्यास गावाचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा संदेश या संवादातून देण्यात आला.

Ad 1
Previous Post

अंध विद्यार्थ्यांच्या सहवासात अनिव्रतचा वाढदिवस उत्साहात साजरा

Next Post

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
8
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
12
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
10
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
34
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

Gen Z सोलापूरकर हजारोंच्या संख्येने पुण्यात दाखल; खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमस्थळी सेल्फी

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In