• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बांबवडे परिसरात बिबट्याची दहशत! थेट घरात शिरून कुत्र्याला उचलले; शाहूवाडी वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांचा एल्गार

Pratik Tidke by Pratik Tidke
August 24, 2026
in Blog
0
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

बांबवडे (प्रतिनिधी) :
बांबवडे परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, वन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. बांबवडे-कोकरूड मार्गालगत असलेल्या मध्यवर्ती मानवी वस्तीत भरदिवसा बिबट्याने थेट घराच्या आवारात शिरून पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी घडली.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

भरदिवसा कुत्र्यावर झडप
बांबवडे येथील आनंदा दिलीप निकम यांचे घर बांबवडे-कोकरूड रस्त्यालगत आहे. दुपारी सुमारे एकच्या सुमारास अचानक बिबट्या निकम यांच्या घराच्या मागच्या बाजूस आला आणि त्याने घरात असलेल्या पाळीव कुत्र्यावर झडप घातली. निकम यांच्या पत्नीने आरडाओरड केल्याने बिबट्याने सुरुवातीला कुत्र्याला सोडून पलायन केले. मात्र, काही मिनिटांतच बिबट्या पुन्हा घटनास्थळी परतला आणि जखमी कुत्र्याला उचलून शेजारील उसाच्या शेतात घेऊन गेला. निकम यांच्या पत्नी घराच्या अगदी समोर असताना हा प्रकार घडल्याने त्यांची मोठी घाबरगुंडी उडाली. त्यांनी प्रसंगावधान राखून घरात धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

बिबट्याचा बंदोबस्त कधी?
उसाची शेती, दाट झाडी आणि मानवी वस्तीचा विस्तार यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळत असून तो वारंवार मानवी वस्तीकडे येत आहे. “आज कुत्र्यावर हल्ला झाला, उद्या एखाद्या माणसावर हल्ला झाल्यावरच वन विभाग जागा होणार का?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. बिबट्याला तात्काळ पिंजरा लावून पकडण्यात यावे आणि परिसर भयमुक्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रतिक्रिया :
“शाहूवाडी तालुक्यातील डोंगरी भागासह अन्य भागांत जंगली प्राण्यांचा वावर वाढला आहे. यात अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. भविष्यात मानवासही धोका निर्माण होऊ शकतो. वन विभागाने लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन तात्काळ उपाययोजना करावी; अन्यथा वन विभागाच्या गलथान कारभाराविरोधात वेगळा विचार करावा लागेल.”
— सौ. राजकुंवर गायकवाड (जि. प. सदस्या)
“वन विभागातर्फे परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. त्यात अद्याप बिबट्याची हालचाल दिसून आलेली नाही. सध्या पाहणी सुरू आहे. अशी घटना पुन्हा दिसून आल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा.”
— उज्ज्वला मगदूम (वनपरिक्षेत्र अधिकारी, शाहूवाडी)

Ad 1
Previous Post

बांबवडे ग्रामपंचायतीत ‘वॉटर मीटर’ खरेदीत ६.३१ लाखांचा भ्रष्टाचार; सखोल चौकशीची अभयसिंह चौगुले यांची प्रशासनाकडे मागणी

Next Post

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
3
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

गणेशभाऊ कोकणे यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In