डोंगरवाडी, ता. वाळवा, जि. सांगली : श्रावणी शनिवार निमित्त श्री क्षेत्र हनुमान मंदिर, डोंगरवाडी येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंट यांच्या वतीने क्राऊड कंट्रोल व आपत्ती व्यवस्थापन सेवा सुरू करण्यात आली आहे.
मंदिर परिसरात भाविकांची सुरक्षितता, शिस्तबद्ध रांगा, गर्दीचे योग्य नियोजन तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवक सेवा बजावत आहेत.
श्रावणी शनिवारच्या निमित्ताने मंदिरात येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, शिस्तबद्ध व सुरळीत दर्शन घेता यावे, यासाठी अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिजास्टर मॅनेजमेंटच्या स्वयंसेवकांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे.
भाविकांची सुरक्षितता आणि सेवा हीच आमची प्राथमिकता! 🙏🚩
स्थळ : श्री क्षेत्र हनुमान मंदिर, डोंगरवाडी
ता. वाळवा, जि. सांगली









