राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंबेगाव तालुका उपाध्यक्ष, भीमाशंकर पर्यटन संस्थेचे अध्यक्ष तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक गणेशभाऊ श्रीरंग कोकणे यांच्या ५० वर्षपूर्तीनिमित्त (अमृत महोत्सवी वर्ष) २४ ते २७ ऑगस्ट दरम्यान भव्य अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने चार दिवस विविध सामाजिक, धार्मिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम पार पडणार आहेत.
कार्यक्रमांची रूपरेषा:
- सोमवार, २४ ऑगस्ट: श्रावण सोमवारनिमित्त डिंभे खुर्द येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत फराळ वाटप आणि प्रसिद्ध भजनसम्राट प्रकाश बोर्हाडे यांचा भक्तिमय भजनाचा कार्यक्रम.
- मंगळवार, २५ व बुधवार, २६ ऑगस्ट: पंचक्रोशीतील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम.
- गुरुवार, २७ ऑगस्ट (मुख्य सोहळा):
- सकाळी ९ ते ११: ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे प्रबोधनात्मक हरिकीर्तन.
- सकाळी ११ वाजता: अभीष्टचिंतन सोहळा व त्यानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजन.
- दुपारी १ ते ४: महिलांसाठी मिथुन पांचाळ प्रस्तुत ‘सन्मान स्त्री शक्तीचा – खेळ पैठणीचा’ हा मनोरंजनाचा खास कार्यक्रम.
- दुपारी ४ वाजता: भव्य बक्षीस वितरण समारंभाने सोहळ्याची सांगता.
या सर्व कार्यक्रमांना पंचक्रोशीतील नागरिक, महिला, युवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






