सुलतानपूर (विशेष प्रतिनिधी):
सुलतानपूर (माळेवाडी) येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी व मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. अण्णाभाऊ साठे व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
या जयंती महोत्सवाचे अध्यक्षस्थान आयुष्यमान भारत मिशनचे अध्यक्ष मा. डॉ. ओमप्रकाश शेटे साहेब यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्री. जयदत्त (आण्णा) नरवडे यांच्या हस्ते पार पडले. तर प्रमुख पाहुणे म्हणून लहुजी विद्रोही सेनेचे प्रमुख मा. श्री. भास्कर (नाना) शिंदे उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर, साहित्यावर आणि त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत, असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात करण्यात आले.
कार्यक्रमासाठी गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला व विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित अर्जुन लोखंडे यांनी केले.
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्राची लाडकी गायिका गायत्री साळवे पुणेकर यांच्या प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम ठरला. त्यांनी साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे, छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील बहारदार गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या जयंती महोत्सवाचे यशस्वी आयोजन ग्रामपंचायत सदस्य दत्ता लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय थोरात, महादेव लोखंडे, विशाल थोरात, कृष्णा लोखंडे, अशोक लोखंडे, रमेश लोखंडे, सुनील थोरात वसंत लोखंडे संजय लोखंडे बाळू लोखंडे यांनी केले.
शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.











