• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
एस.टी. तिकीट दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
0
SHARES
30
VIEWS
Ad 1

मा.आमदार विरेंद्र जगताप यांचे नेतृत्व

RelatedPosts

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

चांदूर रेल्वे : उड्डाणपूल सुरू होऊन दोन वर्षे उलटली असून या मार्गावरून एस.टी. बससेवाही सुरू आहे. मात्र, एस.टी. महामंडळाकडून अद्याप जुन्या लांब मार्गानुसार तिकीटदर आकारले जात असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. त्यामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पालक, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या वतीने चांदूर रेल्वे एस.टी. डेपो व्यवस्थापकांना घेराव घालून आंदोलन करण्यात आले. चांदूर रेल्वे ते सोनगाव, कळमगाव, कळमजापूर, बग्गी, जवळा निंभा आणि राजुरा या मार्गांवरील तिकीट व पासचे दर तातडीने कमी करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून प्रवाशांकडून अतिरिक्त आकारण्यात आलेली रक्कम त्यांना परत करावी, अशी मागणीही आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांनी केली. प्रवाशांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून एस.टी. महामंडळाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. यावेळी आगार व्यवस्थापकांनी या मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले.

या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव परीक्षित जगताप यांची उपस्थिती होती. विद्यार्थी-विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, पालक, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

याशिवाय, चांदूर रेल्वे एस.टी. डेपो परिसरातील स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी तसेच प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणीही करण्यात आली. प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि परवडणारी वाहतूक सेवा उपलब्ध करून देणे ही एस.टी. महामंडळाची जबाबदारी असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. यावेळी भाऊंसोबत असंख्य विद्यार्थी व काँग्रेसचे कार्यकर्ते रुपेश पुडके, शेट्टुदादा सूर्यवंशी,स्वप्निल मानकर, प्रफुल कोकाटे, सारंग देशमुख,अरविंद गुरुदे,अभिजीत देशमुख, अनंत पोलाद, आर्यन वानखडे, रुपेश बनसोड, दत्तात्रय भागवत, प्रवीण चींचे, आदीमनी बोधिले, राजेश बनसोड, संयोग ठाकरे, जीवन आगाशे, प्रतीक भैसे, सौरभ गावंडे, भावना बाणेकर, पायल कांबळे, आचल शेंडे, चैताली चौधरी, अस्मिता बेले, परी गोल्हे, सिद्धी बोडकुठे, रिया रंगारी, मंजुषा शेंडे, प्रणिता सहारे, कशिष पोहेकर, ऋतुजा कावरे, संजय राव गावंडे, हनुमान जी मोडक, वैभव चुकेकर, प्रमोद सोनवणे, राहुल राऊत, अथर्व वनवे, प्रफुल माईंदे, अर्पित चौधरी, सराड दादा, दिनेश चौकडे, शंतनु राऊत, प्रणव इंगळे, असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Previous Post

दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन, मारेगाव, मार्डी चौक व आंबेडकर चौक सिग्नल लाईट तथा ट्राफिक हवालदार यांची नियुक्ती गरजेची………

Next Post

धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!

Related Posts

Blog

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
0
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
Blog

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
1
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!
Blog

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026
8
धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!
Blog

धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!

August 25, 2026
2
Blog

दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन, मारेगाव, मार्डी चौक व आंबेडकर चौक सिग्नल लाईट तथा ट्राफिक हवालदार यांची नियुक्ती गरजेची………

August 25, 2026
4
पनवेलमध्ये ६६.६२ लाखांचे सोने अपहार प्रकरण उघड; आरोपी सोलापुरातून जेरबंद…
Blog

पनवेलमध्ये ६६.६२ लाखांचे सोने अपहार प्रकरण उघड; आरोपी सोलापुरातून जेरबंद…

August 25, 2026
11
Next Post
धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!

धामणीत श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाचा धर्मध्वज उभारणीने शुभारंभ…!

ताज्या बातम्या

पुण्यात निधीच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष पेटला

August 25, 2026
वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

वननेस वन सेवा – सीझन -६ अंतर्गत वृक्षारोपणाचा पावन कार्यक्रम रहीमाबाद येथे अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

August 25, 2026
राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

राष्ट्रीय समाज पक्षाच्या मागणीला अखेर यश!

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In