• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेलमध्ये ६६.६२ लाखांचे सोने अपहार प्रकरण उघड; आरोपी सोलापुरातून जेरबंद…

Pratik Tidke by Pratik Tidke
August 25, 2026
in Blog
0
पनवेलमध्ये ६६.६२ लाखांचे सोने अपहार प्रकरण उघड; आरोपी सोलापुरातून जेरबंद…
0
SHARES
29
VIEWS
Ad 1
Ad 1

कळंबोली | प्रतिनिधी |श्रीनाथ(गणेश) लाड|:
पनवेल शहरातील स्वरूप रिफायनरी ज्वेलर्स शॉपमधून तब्बल ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये किमतीच्या ६६६.२३ ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या लगडींचा अपहार केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीकडून अपहार केलेल्या सहाही सोन्याच्या लगडी हस्तगत केल्या आहेत.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट २०२५ रोजी स्वरूप रिफायनरी ज्वेलर्समधील कामगार शुभम मनाजी खिलारे याच्याकडे सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ६६६.२३ ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या लगडी देण्यात आल्या होत्या. मात्र, आरोपीने या सोन्याचा अप्रामाणिकपणे अपहार केल्याची तक्रार करण्यात आली. याप्रकरणी २१ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(४) अन्वये पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी विविध पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी पनवेल शहर तसेच रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्याचबरोबर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्यात आला.

तपासादरम्यान आरोपी कुरुडवाडी, सोलापूर येथे रेल्वेतून उतरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा माग काढत खिलारवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे जाऊन शुभम मनाजी खिलारे याला ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याच्याकडून गुन्ह्यातील ६६६.२३ ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या लगडी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

ही कारवाई पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, परिमंडळ-३, पनवेल आणि सहायक पोलीस आयुक्त मधुर भुजबल, पनवेल विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकिर पटेल, पोलीस निरीक्षक (प्रशासन) अभिजीत अभंग यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही कामगिरी केली.

या कारवाईत सपोनि अभिजीत पाटील, पोउपनि हजरत पठाण, पोउपनि किरण राऊत, पोहवा अविनाश गंथडे, योगेश दिवेकर, अमोल पाटील, संदेश म्हात्रे, पोना मिथुन भोसले, पोशि किरण कराड, पोना सोमनाथ म्हात्रे आणि पोशि शशिकांत काकड यांचा सहभाग होता.

Ad 1
Previous Post

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात अँटी-रॅगिंग कार्यशाळेचे आयोजन

Next Post

दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन, मारेगाव, मार्डी चौक व आंबेडकर चौक सिग्नल लाईट तथा ट्राफिक हवालदार यांची नियुक्ती गरजेची………

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
2
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
8
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
2
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post

दुर्घटनेच्या प्रतीक्षेत प्रशासन, मारेगाव, मार्डी चौक व आंबेडकर चौक सिग्नल लाईट तथा ट्राफिक हवालदार यांची नियुक्ती गरजेची………

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In