• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

Pratik Tidke by Pratik Tidke
August 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
106
VIEWS
Ad 1
Ad 1

पुरंदर | प्रतिनिधी :

सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ तसेच दहीहंडी उत्सव २०२६च्या अनुषंगाने सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळे, दहीहंडी आयोजक, पोलीस पाटील, महिला दक्षता समिती, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांची आढावा बैठक सासवड नगरपालिका सभागृहात पार पडली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

उपविभागीय पोलीस अधिकारी, भोर उपविभाग श्री. राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत गणेशोत्सव व दहीहंडी उत्सव शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी गणेशोत्सवात सामाजिक व विधायक उपक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देत ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करावे. ध्वनिक्षेपक व डीजेच्या आवाजाची निर्धारित मर्यादा ओलांडल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला. तसेच गणेश विसर्जन मिरवणुका रात्री १२ वाजण्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी पुरंदरची ओळख असलेल्या अंजीर व सीताफळाप्रमाणे गणेशोत्सवातही आगळावेगळा सामाजिक संदेश देणारा उपक्रम राबवावा, असे सांगितले. ‘डीजे मुक्त मिरवणूक आणि पारंपरिक वाद्यांसह गणेशोत्सव’ साजरा करून पुरंदरची वेगळी ओळख निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.

बैठकीदरम्यान गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना मांडल्या. पत्रकार हेमंत ताकवले यांनीही आपल्या मनोगतातून काही महत्त्वाच्या सूचना केल्या.

बैठकीस सासवड नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, नायब तहसीलदार संदीप पाटील, महावितरणचे अभियंता, सासवड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, दहीहंडी आयोजक, पोलीस पाटील, पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीचे नियोजन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभागातील रुपेश भगत यांनी केले.

Ad 1
Tags: Purandar Gaikwad
Previous Post

माहूरमध्ये आजपासून श्रीदत्त पंचकोशी परिक्रमा; २५ किलोमीटरच्या पवित्र परिक्रमेचे आयोजन

Next Post

साखरेच्या दरवाढीविरोधात मनसे महिला आघाडीचा पनवेलमध्ये एल्गार; तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

साखरेच्या दरवाढीविरोधात मनसे महिला आघाडीचा पनवेलमध्ये एल्गार; तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In