• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

अमळनेर | प्रतिनिधी

पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी अमळनेर शहरात भव्य जुलूस काढण्यात आला. या जुलूसमध्ये मुस्लिम समाजातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

दुपारी २ वाजेनंतर शहरातील विविध भागांतून जुलूस निघण्यास सुरुवात झाली. कसाली मोहल्ला, शाहआलम नगर, इस्लामपुरा, झामी चौक, पान खिडकी, अंदरपुरा, बाहरपुरा, गांधलीपुरा, जापान जिन, श्रद्धानगर, जोशीपुरा, मिल चाल, तांबेपुरा यासह विविध परिसरातील नागरिक जुलूसमध्ये सहभागी झाले.

जुलूसमध्ये सहभागी नागरिकांच्या हातात इस्लामी झेंडे होते. नात-ए-पाकचे पठण करत पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्याप्रती श्रद्धा व्यक्त करण्यात आली. जुलूसाच्या मार्गावर उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

ईदगाह मैदानावर असरची नमाज

सायंकाळी सुमारे ५ वाजता जुलूस ईदगाह मैदानावर पोहोचला. याठिकाणी समाजबांधवांनी एकत्र येत असरची नमाज अदा केली. जुलूसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मस्जिदी व परिसरांची आकर्षक सजावट

ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने शहरात गेल्या चार-पाच दिवसांपासून विविध तयारी सुरू होती. शहरातील अनेक मस्जिदी तसेच मोहल्ल्यांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्रीच्या वेळी रोषणाईने सजलेली धार्मिक स्थळे आणि परिसर नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

जयनील फाउंडेशनतर्फे पाण्याच्या बाटल्यांचे वाटप

जुलूसमध्ये सहभागी नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकीचे दर्शनही घडले. पाच कंदील चौक येथे जयनील फाउंडेशनच्या वतीने जुलूसमध्ये सहभागी नागरिकांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. उष्ण वातावरणात पाण्याची व्यवस्था केल्याने सहभागी नागरिकांना दिलासा मिळाला. फाउंडेशनच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

ईद मिलादुन्नबीचा हा जुलूस शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आयोजन यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासनासह समाजबांधवांनी सहकार्य केले.

Ad 1
Tags: Manish Jadhav
Previous Post

ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त प्रशासनाचे उत्तम सहकार्य; पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार

Next Post

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
7
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
5
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In