लोहा तालुका प्रतिनिधी गेली 2012नतर अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने पवित्र पोर्टल अस्तित्वात आणलेले आहे पण2017ते2022 कालखंडामध्ये पवित्र पोर्टल सक्रिय नसल्याने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता संस्थेमार्फत महाराष्ट्रभर शिक्षकाची नियुक्ती संस्थेने केल्याने या शिक्षकांनी हायकोर्ट औरंगाबाद ,कोल्हापूर, मुंबई नागपूर ,नासिक ,यवतमाळ अशा अनेक हायकोर्टातची धाव घेतली आणि शासनाच्या विरोधी बाजूने कोर्टाने निकाल दिला पण प्रत्येक डि वाय डी ने हायकोर्टाचा निकालाला केराची टोपली दाखवत सुप्रीम कोर्टामध्ये एसएलपी दाखल केली आणी या शिक्षकावर गदा आणण्याचे काम महाराष्ट्र शासनाने केलेले आहे त्या अनुषंगाने सर्व महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक एक जुटले आहे त्याबद्दल महाराष्ट्रातून या एकीचे स्वागत करण्यात येत आहे ही एक जुट करण्याचे काम कोल्हापुरी विभागातुन व लातूर विभागातून जोरात होत आहे अशी चर्चा सर्वत्र दिसून येत आहे.










