• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोह्यातील नगरेश्वर मंदिरात भक्तीचा जागर;महादेवाचे दररोज विविध देवतांच्या रूपात दर्शन..

Pratik Tidke by Pratik Tidke
August 29, 2026
in Blog
0
लोह्यातील नगरेश्वर मंदिरात भक्तीचा जागर;महादेवाचे दररोज विविध देवतांच्या रूपात दर्शन..
0
SHARES
24
VIEWS
Ad 1
Ad 1

श्री विठ्ठल, बालाजी, दत्तात्रेय, महाकाल रूपातील मनोहारी शृंगार; दुपारी २ ते ५ जलाभिषेकाची संधी…

RelatedPosts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

लोहा : प्रतिनिधी- हणमंत पांचाळ,

पवित्र श्रावण महिन्यानिमित्त लोहा शहरातील ऐतिहासिक व जागृत श्री नगरेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोजच्या प्रदोष पूजेदरम्यान नगरेश्वर महादेवाला विविध देवतांच्या रूपात सजविण्यात येत असल्याने हे मनोहारी रूप पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. प्रदोष पूजेवेळी नगरेश्वर महादेवाला विठ्ठल, तिरुपती बालाजी, भगवान दत्तात्रेय, उज्जैनच्या महाकालासह विविध देवतांचे स्वरूप साकारले जात आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, लोहा शहरासह परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत.

मंदिरात वर्षातील इतर ११ महिने गर्भगृहात पुजाऱ्यांमार्फत पूजा-अर्चा केली जाते. मात्र, श्रावण महिन्यात भाविकांना स्वतःच्या हाताने महादेवाला जलाभिषेक करण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सकाळी ६ वाजता नगरेश्वराची नित्यपूजा व मुख्य अभिषेक होतो. त्यानंतर दुपारी २ ते ५ या वेळेत सर्वसामान्य भाविकांसाठी जलाभिषेक व रुद्राभिषेकाची व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री विष्णुसहस्रनाम पठण, शिवमहापुराण कथा व ‘ॐ नमः शिवाय’ नामजपाचे आयोजन केले जाते.श्रावणातील प्रत्येक सोमवारी नगरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागत आहेत. दर सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्याने मंदिर प्रशासनाकडून दर्शन व्यवस्था तसेच भाविकांच्या शिस्तीसाठी नियोजन करण्यात आले आहे.

श्री नगरेश्वर मंदिराची स्थापना ६ फेब्रुवारी १९७२ रोजी वैकुंठवासी ह.भ.प. शंकर महाराज कंधारकर यांच्या हस्ते झाली. भगवान शंकराची नियमित पूजा-अर्चा व धार्मिक सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मंदिराची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासून आजतागायत ह.भ.प. वामन महाराज पालमकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथे नित्यनियमाने पूजा-अर्चा व विविध धार्मिक उपक्रम सुरू आहेत.श्रावण महिन्यासोबतच महाशिवरात्र आणि वै. रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्यामुळे नगरेश्वर मंदिर हे लोहा शहरातील भाविकांसाठी श्रद्धा आणि भक्तीचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.

Ad 1
Previous Post

अकोला सामान्य रुग्णालय अकोला, येथिल धक्कादायक प्रकार, जिल्हाध्यक्ष मा.जिल्हाधिकारी घेणार संज्ञान.?

Next Post

महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकाचे एस. एल. पी विरोधी संघटन ______

Related Posts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
Blog

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
10
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
8
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
17
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
11
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
17
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
4
Next Post

महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकाचे एस. एल. पी विरोधी संघटन ______

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In