• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जत तालुका दुष्काळी जाहीर करावा, अन्यथा २ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन – रिपाइं (आठवले) चा प्रशासनाला इशारा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 29, 2026
in Blog
0
जत तालुका दुष्काळी जाहीर करावा, अन्यथा २ सप्टेंबर रोजी तीव्र आंदोलन – रिपाइं (आठवले) चा प्रशासनाला इशारा
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

जत / प्रतिनिधी(अरुण कोळी)

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा, दुष्काळी सवलती लागू कराव्यात आणि म्हैसाळ योजनेचे आवर्तन निरंतर सुरू ठेवावे, या प्रमुख मागण्यांसाठी दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे.

जत तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खालावली असून जत पूर्व व दक्षिण भागात १००० फूट विंधन विहिरी खोदूनही पाणी लागत नसल्याची वस्तुस्थिती आहे. बहुतांशी साठवण तलाव कोरडे पडले आहेत. शेतीला व जनावरांना चारा-पाणी मिळणे दुरापास्त झाले असून पाणी व चाऱ्याअभावी पशुधन तडफडत आहे.

पशुपालक व शेतकरी आपली जनावरे खाटकाच्या दावणीला जाऊ नयेत म्हणून चारा-पाण्यासाठी रानोमाळ भटकत आहेत. माडग्याळ येथे तालुक्यातील पहिला चारा डेपो सुरू करण्यात आला असून यावरून दुष्काळाची तीव्रता लक्षात येते.

तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून मजूर रोजगारासाठी अन्य राज्यात स्थलांतरित होत आहेत.

प्रमुख मागण्या :
१. जत तालुका त्वरित दुष्काळी म्हणून जाहीर करून दुष्काळी सवलती लागू कराव्यात.
२. म्हैसाळ योजनेचे आवर्तन कायमस्वरूपी सुरू ठेवावे व बंदिस्त पाईपलाईनची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत.
३. गावोगावी रोजगार हमी योजनेची कामे, वृक्ष लागवडीची कामे सुरू करावीत.
४. गरज असलेल्या ठिकाणी जनावरांसाठी चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत.
५. तालुक्यात सुरू असलेली बेकायदेशीर वृक्षतोड त्वरित थांबवावी. साळमळगेवाडी, जिरग्याळ रस्त्यावरील सुझलॉन कंपनीने केलेल्या मोठ्या झाडांच्या बेकायदेशीर वृक्षतोडीची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी. दररोज ४० ट्रक लाकूड तालुक्याबाहेर जात असून याचीही चौकशी व्हावी.

शासनाने या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा गुरुवार दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रती केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले साहेब, जिल्हाधिकारी सांगली, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सांगली, उपविभागीय पोलीस अधिकारी जत, पोलीस निरीक्षक जत, वनक्षेत्रपाल अधिकारी जत, तहसीलदार जत व गटविकास अधिकारी जत यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Ad 1
Previous Post

महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकाचे एस. एल. पी विरोधी संघटन ______

Next Post

बापूसाहेब माधवराव कापुरे यांना तुफानातील दिवे पुरस्कार जाहीर

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post
बापूसाहेब माधवराव कापुरे यांना तुफानातील दिवे पुरस्कार जाहीर

बापूसाहेब माधवराव कापुरे यांना तुफानातील दिवे पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In