• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तापी खोरे विकास प्रकल्पाला माजी आमदार अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे नाव देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार,आमदार राजेशदादा पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश.

Pratik Tidke by Pratik Tidke
August 29, 2026
in Blog
0
तापी खोरे विकास प्रकल्पाला माजी आमदार अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे नाव देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार,आमदार राजेशदादा पाडवी यांच्या पाठपुराव्याला यश.
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि29(का.प्र.)
शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय असलेल्या तापी खोरे विकास प्रकल्पाला भागातील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार स्वर्गीय अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे नाव देण्याबाबत शासन स्तरावर गांभीर्याने विचार सुरू आहे. या संदर्भात तळोदा-शहादा मतदारसंघाचे आमदार श्री. राजेशदादा पाडवी यांनी शासनाकडे सातत्याने आणि आग्रही पाठपुरावा केला होता. या मागणीची शासनाने दखल घेतली असून लवकरच यावर धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमदार राजेशदादा पाडवी यांनी तापी खोरे विकास प्रकल्पाला अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे नाव देऊन त्यांच्या लोकसेवेचा व कृषी क्षेत्रातील योगदानाचा गौरव करावा, अशी मागणी राज्य शासनाकडे लावून धरली होती. या मागणीची शासन स्तरावर अत्यंत गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे.राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदा विभागाचे मंत्री ना. गिरीश महाजन यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.

RelatedPosts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

“सदर बाब धोरणात्मक स्वरूपाची असून सध्या शासनाच्या विचाराधीन आहे. शासनाचे धोरण अंतिम झाल्यानंतर आमदार राजेशदादा पाडवी यांच्या विनंतीनुसार या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल,” असे जलसंपदा मंत्र्यांनी कळविले आहे.माजी आमदार अण्णासाहेब पी. के. पाटील यांनी तापी परिसराच्या सिंचनासाठी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांचा हा वारसा आणि स्मृती जपण्यासाठी तापी खोरे विकास प्रकल्पाला त्यांचे नाव देणे ही संपूर्ण परिसराची आणि लोकभावना होती.

हीच लोकभावना लक्षात घेऊन आमदार राजेशदादा पाडवी यांनी शासन दरबारी वारंवार पत्रव्यवहार आणि बैठकांच्या माध्यमातून हा विषय लावून धरला होता.आमदार पाडवी यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि प्रयत्नांतील गांभीर्यामुळे हा महत्त्वपूर्ण विषय आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.शासनाकडून धोरणात्मक मंजुरी मिळताच तापी खोरे विकास प्रकल्पाला अण्णासाहेबांचे नाव देण्याची औपचारिक घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.तापी खोरे विकास प्रकल्पाला अण्णासाहेब पी. के. पाटील यांचे नाव मिळण्याच्या मार्गातील अडसर दूर होत असल्याने आणि शासनाकडून सकारात्मक संकेत मिळाल्याने तळोदा व शहादा तालुक्यातील शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि आम नागरिकांमध्ये अत्यंत आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले आहे. आमदार राजेशदादा पाडवी यांच्या या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आणि जनभावनेचा आदर केल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Ad 1
Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत अनियमिततेचा आरोप;गटनेते तथा आ.विजयभाऊ वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांचे निवेदन

Next Post

शहादा येथे बालसंगोपन योजना शिबिर यशस्वी संपन्न.

Related Posts

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव
Blog

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
4
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..
Blog

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
5
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..
Blog

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026
14
Blog

लोकशाही वाचवण्यासाठी रस्त्यावर: ‘वोट चोरी’विरोधात घणसोलीत मनसेचा एल्गार; भव्य निदर्शने आणि स्वाक्षरी मोहीम संपन्न!

October 13, 2026
10
Blog

बँक कर्ज मागणीसाठी वापरा जण समर्थ पोर्टल.

October 13, 2026
14
Blog

कचरे से प्यार और इंसानी जान की बेकद्री: क्या यही आज की दुनिया की सच्चाई है?

October 13, 2026
3
Next Post
शहादा येथे बालसंगोपन योजना शिबिर यशस्वी संपन्न.

शहादा येथे बालसंगोपन योजना शिबिर यशस्वी संपन्न.

ताज्या बातम्या

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

समाज प्रगती सहयोग संस्था आयोजित पारंपरिक बीज महोत्सव

October 13, 2026
अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

अंतुर्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे जय शिवाजी दुर्गा मंडळाने साकारले एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप.. बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दिव्य दर्शन..

October 13, 2026
बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

बोदर्डे येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ उत्साहात संपन्न; युरिया प्रक्रियेचे प्रात्यक्षिक व दूध उत्पादनातील समस्यांवर मार्गदर्शन! सारथी महाराष्ट्राचा तालुका प्रतिनिधी विलास पाटील..

October 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In