• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

*रक्षाबंधन हिंदू सण….

Pratik Tidke by Pratik Tidke
August 30, 2026
in Blog
0
*रक्षाबंधन हिंदू सण….
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

प्रतिनिधी -दरिकांत कोळेकर.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

कुरुंदवाड :-श्रावण महिना म्हणजे हिंदू सणाची रेलचेल असते अनेक सण या महिन्यात येत असतात. त्यातील एक सण जो भावा- बहिणीच्या अलोट प्रेमाचे, त्यागाचे, रक्षणाचे, श्रध्येचे, मायेची दर्शन घडवून आणणारा ” रक्षा बंधन” हा सण महत्वाचा मानला जातो.
रक्षाबंधन हा हिंदूंचा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे, जो दक्षिण आशिया तसेच जगाच्या इतर भागांमध्ये विशेषतः हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो. या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोर विधिवत बांधतात. ही राखी त्यांच्या भावांकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.

राखी
रक्षाबंधन हा श्रावणातील प्रमुख सण आहे. यामध्ये बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात.
रक्षाबंधन हा हिंदू दिनदर्शिकेतील श्रावण महिन्यात साजरा केला जातो, जो सामान्यतः ऑगस्टमध्ये येतो. रक्षाबंधन ह्याचा शब्दशः संस्कृत अर्थ “संरक्षण, बंधन किंवा काळजी” असा होतो. बहीण-भावाचा हा सण, ज्याचा उगम लोक-संस्कृतीमध्ये झाला, त्याला स्थानानुसार वेगवेगळी नावे होती; काही ठिकाणी सलुनो, सिलोनो, आणि राकरी असे म्हणले जात होते.
विवाहित स्त्रियांसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. काही प्रदेशांमध्ये किंवा गावांमध्ये बहिर्विवाह प्रथा आहे. यामध्ये वधू तिच्या जन्माच्या गावाबाहेर लग्न करते आणि प्रथेनुसार तिचे पालक तिच्या विवाहित घरी जात नाहीत.

उत्तर भारतातील ग्रामीण भागांत जिथे अनेक खेड्यांमध्ये बहिर्विवाह पद्धती प्रचलित आहे, तिथे मोठ्या संख्येने विवाहित हिंदू स्त्रिया दरवर्षी त्यांच्या पालकांच्या घरी सणासाठी परत जातात.त्यांचे भाऊ, जे विशेषतः पालकांसोबत किंवा जवळपास राहतात, कधीकधी त्यांच्या बहिणींच्या विवाहित घरी त्यांना परत घेऊन आणण्यासाठी जातात. अनेक तरुण विवाहित स्त्रिया त्यांच्या जन्माच्या घरी काही आठवड्यांपूर्वी येतात आणि समारंभ होईपर्यंत राहतात. भाऊ हे बहिणीचे सासर आणि माहेर यांच्यामध्ये आजीवन मध्यस्थ म्हणून काम करतात.
शहरी भारतात, जिथे कुटुंबे अधिकाधिक विभक्त होत आहेत, तिथे हा सण अधिक प्रतीकात्मक बनला असला तरीही तो खूप लोकप्रिय आहे. या उत्सवाशी संबंधित विधी त्यांच्या पारंपारिक प्रदेशांच्या पलीकडे पसरले आहेत. तंत्रज्ञान, स्थलांतर, चित्रपट, सामाजिक संवाद, आणि हिंदू धर्माच्या राजकीय प्रचाराद्वारे या सणाचे स्वरूप बदलले जात आहे.

रक्ताचे नाते नसलेल्या स्त्रिया आणि पुरुषांमध्ये स्वैच्छिक नातेसंबंधांची एक बदललेली परंपरा देखील आहे. यासाठी जाती आणि वर्गाच्या पलीकडे तसेच हिंदू आणि मुस्लिम हा भेद विसरून राखी बांधली जात आहे.
मात्र सद्या महिलांचे बहिणींचे रक्षण करणे सोडा, फार विचित्र घटना घडताना पाहतो की काय चाललंय या जगात महिला सुरक्षित नाही. अत्याचार, लैगिक शोषण, बलात्कार, हत्या रोज घडत आहेत. माया, ममता, प्रेम या भावना माणसात राहिल्यात की नाही अशी शंका निर्माण होत आहे.
सन १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांनी झाशीला वेढा दिला होता. अशा कठीण प्रसंगी राणी लक्ष्मीबाईंनी धर्म आणि जातीच्या पलीकडे जाऊन बांदाचा नवाब अली बहादूर द्वितीय याला राखी आणि एक पत्र पाठवून मदतीची मागणी केली होती.राणी लक्ष्मीबाई आणि राखीची ऐतिहासिक कथासंकट आणि वेढा: १८५७ च्या क्रांतीच्या काळात इंग्रज सैन्याने झाशीच्या किल्ल्याला चारही बाजूंनी घेरले होते.

राणीकडे तुटपुंजे सैन्य आणि शस्त्रे होती.राखी आणि पत्र पाठवणे: स्वतःला संकटात पाहून राणीने बांदाचे नवाब अली बहादूर यांना आपला भाऊ मानले आणि त्यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी एका पत्रासोबत नवाबसाहेबांना राखी पाठवली.भावनिक संदेश: त्या पत्रात बुंदेली भाषेत लिहिले होते की, भारतावर परदेशी इंग्रजांचे शासन नसावे आणि “माझ्या बहिणीची लाज धोक्यात आहे, मला मदत करा.”नवाबचा प्रतिसाद: राणीने पाठवलेल्या राखीचा आणि संदेशाचा मान राखून नवाब अली बहादूर यांनी आपल्या १०,०० हजार सैनिकांसह झाशीच्या मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी इंग्रजांशी अदम्य साहस दाखवून लढा दिला.ही घटना भारत देशात हिंदू-मुस्लिम ऐक्याची आणि परस्पर स्नेहाची एक अमर व ऐतिहासिक साक्ष ठरली.

Ad 1
Previous Post

आरंभ फाउंडेशन कडून मानवनिर्मित देवराईचे जनक रघुनाथ ढोले सर यांचा बीज तुला सोहळा संपन्न…

Next Post

गणेशोत्सव निमित्याने गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांच्याबरोबर कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि शितलकुमार डोईजड यांचे बैठकीचे आयोजन…

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
29
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
13
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
10
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
42
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

गणेशोत्सव निमित्याने गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांच्याबरोबर कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनि शितलकुमार डोईजड यांचे बैठकीचे आयोजन…

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In