सन्माननीय संपादक महोदय प्रसिद्धी साठी 👇🏻
कल्याण अंबरनाथ – आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन उत्सव साजरा करताना काॅस्मोग्लोबल मानवाधिकार विचार संघम असोशीएशन आॅफ इंडिया च्या महिलांना विभागीय महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सौ मेघना तुकाराम भिके श्री बाळासाहेब शिंदे वेंकटेश गट्टेगला आणि महिला भगिनींच्या सह डोंबिवली आणि अंबरनाथ येथील अनाथ आश्रमाला भेटी देऊन लहान मुलांसह वृध्दांना राखी बांधून गोड खाऊ व पेन भेटवस्तू दिल्या या समयी संघटनेच्या सौ मेघना तुकाराम भिके यांनी बोलताना सांगितले कि आम्ही वर्षभर संस्था प्रमुख डॉ प्रकाश यशवंत कांबळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार न्यायीक काम करतोच परंतु परंपरेनुसार राखी बांधून सन साजरा करतो आज अनाथ आश्रमाला भेट दिल्याने मनाला एक अनोखं आनंद आणि समाधान मिळत आहेच तर दुसरीकडे वयस्कर व्यक्तींना पाहून मन हेलावून जाते आज जे वयस्कर आहे त्यांची अवस्था पुढे जाऊ अशीच राहिली तर जिवन एक प्रवास असला तरी जिवनात जे काही कमवून ठेवतो ते नश्वर असल्याचं वाटत उपस्थित राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे यांनी सर्व व्यवस्थापकीय मंडळींचे आभार मानले आणि कार्यक्रम आटोपून परतले.









