• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रुग्णांना मोफत भोजन मिळत नसल्याची तक्रार; संघर्ष ग्रुपचा उपोषणाचा इशारा

Pratik Tidke by Pratik Tidke
August 31, 2026
in Blog
0
रुग्णांना मोफत भोजन मिळत नसल्याची तक्रार; संघर्ष ग्रुपचा उपोषणाचा इशारा
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1

राहुल राठोड
ता. प्रतिनिधी…

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

खामगाव : राज्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत भोजन मिळावे, अशी तरतूद असतानाही अनेक ठिकाणी रुग्णांना भोजन मिळत नसल्याचा आरोप संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दशरथ गोपाळराव घुले यांनी केला आहे. काही रुग्णालयांमध्ये भोजन दिले जात असले तरी त्याचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रारही त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

खामगाव येथील संघर्ष ग्रुपकडून लोकसहभागातून रुग्णांसाठी मोफत टिफिन सेवा सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अनेक रुग्णालयांमधून भोजनासाठी संघर्ष ग्रुपकडे दूरध्वनीद्वारे मागणी केली जात असल्याने शासनाच्या योजनेचा लाभ संबंधित रुग्णांपर्यंत पोहोचत नसल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

योजनेअंतर्गत रुग्णालयांना भोजनासाठी शासनाकडून अनुदान मिळत असल्यास त्यामध्ये गैरव्यवहार होत आहे का, याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. राज्यातील योजनेअंतर्गत असलेल्या सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना तातडीने भोजन उपलब्ध करून द्यावे, तसेच वितरित करण्यात येणाऱ्या भोजनाच्या दर्जाची तपासणी करून निकृष्ट आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच योजनेअंतर्गत असलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये ‘रुग्णांना मोफत भोजन देण्यात येते’ असा फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी संघर्ष ग्रुपने केली आहे.

या मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास २ सप्टेंबर २०२६ पासून खामगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा संघर्ष ग्रुपने दिला आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

प्रतिलिपी : आरोग्यमंत्री, पालकमंत्री बुलढाणा, कामगार मंत्री, जिल्हाधिकारी बुलढाणा तसेच खामगाव शहर पोलीस निरीक्षक यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

Ad 1
Previous Post

श्री वाणी विद्याशाला हायस्कूलमध्ये आर एस पी बालसैनिक पथकाची स्थापना व फलकाचे अनावरण.

Next Post

श्रीवर्धनचे शिक्षक प्रदीप रिकामे ‘कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
47
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
33
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
82
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
7
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
8
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
9
Next Post
श्रीवर्धनचे शिक्षक प्रदीप रिकामे ‘कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित

श्रीवर्धनचे शिक्षक प्रदीप रिकामे 'कोकण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कारा'ने सन्मानित

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In