• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे अधिकारी उतरले रस्त्यावर;

Pratik Tidke by Pratik Tidke
September 1, 2026
in Blog
0
मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे अधिकारी उतरले रस्त्यावर;
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

“शहरातील प्रमुख मार्गांची स्वच्छता”

RelatedPosts

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

परभणी/प्रतिनिधी:- रमेश मुलगीर

परभणी जिल्ह्यातील मानवत येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी कोमल सावरे मॅडम यांनी घेतला पुढाकार मानवत सफाई कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या अचानक संपाच्या पार्श्वभूमीवर शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी नगरपालिका प्रशासन स्वतः कृती मैदानात उतरले आहे. मुख्याधिकारी कोमल सावरे व कर्मचारी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात आज सकाळपासूनच पालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरत शहर स्वच्छतेची धडक मोहीम राबवली. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे नागरिकांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सफाई कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि शहराचे आरोग्य धोक्यात येऊ नये, यासाठी मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी तातडीने पालिकेच्या सर्व विभागांची आपत्कालीन बैठक बोलावली. केवळ आदेश न देता त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला.

आज भल्या पहाटेपासूनच मुख्याधिकाऱ्यांसोबत प्रशासकीय अधिकारी, लिपीक, अभियंता आणि इतर कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रमुख रस्ते, मुख्य चौक आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली. स्वतः मुख्याधिकाऱ्यांनी हातात झाडू घेऊन कचरा उचलल्याने कर्मचाऱ्यांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. काही तासांतच शहरातील मुख्य रस्ते चकाचक करण्यात आले.

प्रशासनाने दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यदक्षता अत्यंत कौतुकास्पद आहे. ऐन संपाच्या काळातही शहराप्रती असलेली निष्ठा सिद्ध करत प्रशासनाने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. या धाडसी आणि कौतुकास्पद कार्याबद्दल शहरवासीयांच्या वतीने नगरपालिका प्रशासन आणि मुख्याधिकारी कोमल सावरे मॅडम यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले जात आहेत.

Ad 1
Previous Post

“पिण्याच्या पाण्यासाठी जाहीर उपोषण

Next Post

शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.

Related Posts

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.
Blog

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

October 18, 2026
0
माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 18, 2026
5
Blog

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 18, 2026
4

October 16, 2026
55
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
35
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
84
Next Post
शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.

शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.

ताज्या बातम्या

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

October 18, 2026
माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 18, 2026

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In