• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 2, 2026
in Blog
0
अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचा भक्तिमय वातावरणात शुभारंभ.
0
SHARES
21
VIEWS
Ad 1
Ad 1

शहादा,दि.०२
श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सोहळ्याचा शुभारंभ आज श्री गोकर्णेश्वर महादेव मंदिर प्रांगण, साईबाबा नगर, शहादा येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी प्रख्यात कीर्तनकार ह. भ. प. राज महाराज पडावदकर (पदवद, ता. शिंदखेडा, जि. धुळे) यांनी आपल्या ओजस्वी वाणीने आणि संतविचारांच्या प्रभावी निरूपणातून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. “कर्म हीच पूजा” या संत सेना महाराजांच्या जीवनतत्त्वज्ञानावर आधारित कीर्तनातून त्यांनी समाजात सदाचार, कर्तव्यनिष्ठा, व्यसनमुक्ती, संतसंग आणि हरिनामाचे महत्त्व अधोरेखित केले.कीर्तनादरम्यान विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. उपस्थित भाविकांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात हरिनाम संकीर्तनाचा आनंद घेतला. “जय जय विठोबा रखुमाई”, “जय जय राम कृष्ण हरी” आणि “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” या जयघोषांनी वातावरण दुमदुमून गेले.या सप्ताहाच्या पहिल्या पुष्पाचे मुख्य यजमान अखिल भारतीय नाभिक समाजाचे अध्यक्ष मा. उद्धवरावजी मक्कन जांभळे होते. त्यांच्या वतीने प्राचार्य डॉ. उद्धव जाधव यांच्या हस्ते ह. भ. प. राज महाराज पडावदकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी परिसरातील अनेक मान्यवर, वारकरी, महिला भगिनी, युवक तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. हेमराज प्रकाश पवार व सौ. ममताताई हेमराज पवार यांच्यासह सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत.

RelatedPosts

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

दरम्यान, जे भाविक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी आयोजकांनी थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे भाविकांना घरबसल्या कीर्तनाचा लाभ घेता येत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अनिल साळुंके यांनी केले.सप्ताहातील पुढील दिवसांमध्ये विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली असून, या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Ad 1
Previous Post

सप्टेंबर मध्येही कमी पावसाचा अंदाज….

Next Post

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

Related Posts

Blog

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
2
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम
Blog

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
5
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी
Blog

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026
15
🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆
Blog

🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆

October 18, 2026
2
मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात
Blog

मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात

October 18, 2026
1
हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी
Blog

हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी

October 18, 2026
3
Next Post
शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

शहादा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती व्याख्यानमाला संपन्न.

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In