• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विनयभंग प्रकरणात पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियंत्रण कक्षात बदली; पीडित महिलेचे आत्मदहन आंदोलन स्थगित

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
विनयभंग प्रकरणात पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियंत्रण कक्षात बदली; पीडित महिलेचे आत्मदहन आंदोलन स्थगित
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

(प्रतिनिधी: शेख मोईन)

RelatedPosts

🦚🪈 परमार्थ निकेतनमध्ये भजनाने रंगणार श्रीकृष्ण जन्मोत्सव! 🪈

NCMC कार्ड सक्तीमुळे सॉफ्टवेअर त्रुटी व टॉप-अप न झाल्याने लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोय बद्ल नाराजी व्यक्त

अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी ५० हजार अनुदान द्याश्री शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुक्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

किनवट:गोकुंदा येथील शासकीय विश्रामगृहात आदिवासी महिलेचा विनयभंग व जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात तक्रार नोंदविण्यास विलंब केल्याचा आरोप असलेले किनवट पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची अखेर पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. दरम्यान, उर्वरित मागण्यांवर आठ दिवसांत कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर पीडित महिलेने नियोजित आत्मदहन आंदोलन तूर्तास स्थगित केले.

दि. २० ऑगस्ट रोजी गोकुंदा येथील शासकीय विश्रामगृहात बालाजी केंद्रे (रा. कोपरा) याने आपला विनयभंग करून जातिवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पीडित महिलेने केली होती तक्रार देण्यासाठी किनवट पोलीस ठाण्यात गेल्यानंतर गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याचा आरोप महिलेने केला होता. आमदार भीमराव केराम यांनी पोलिसांकडे आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आरोपीविरुद्ध विनयभंग व ट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक कराड यांना या प्रकरणात सहआरोपी करावे, तसेच तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी पीडित महिलेने १ सप्टेंबरपासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. मागण्या मान्य न झाल्यास २ सप्टेंबर रोजी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला होता.

यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम यांनी आंदोलनस्थळी जाऊन पीडित महिलेची भेट घेतली. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याची माहिती देत, उर्वरित मागण्यांबाबत आठ दिवसांत कायदेशीर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे महिलेने आत्मदहन आंदोलन तूर्तास स्थगित केले. या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी हाती घेतल्याची माहिती आहे.

पीडित महिलेला लेखी आश्वासन देताना उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम, विकास कुडमते प्रा. विजय खुपसे, शेषेराव कोवे, प्रा. किशन मिरासे, गोपीनाथ बुलबुल व ईतर.

या प्रकरणात आमदार भीमराव केराम यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी विकास कुडमते, प्रा. विजय खूपसे, शेषेराव कोवे, प्रा. किशन मिरासे आणि गोपीनाथ बुलबुले यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.

Previous Post

मारेगाव शहरात अन्न व औषध प्रशासनाची एन्ट्री, व्यावसायिकlत खळबळ

Next Post

साई विद्यालय, वंधली येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा

Related Posts

Blog

🦚🪈 परमार्थ निकेतनमध्ये भजनाने रंगणार श्रीकृष्ण जन्मोत्सव! 🪈

September 3, 2026
0
Blog

NCMC कार्ड सक्तीमुळे सॉफ्टवेअर त्रुटी व टॉप-अप न झाल्याने लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोय बद्ल नाराजी व्यक्त

September 3, 2026
1
Blog

अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी ५० हजार अनुदान द्याश्री शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुक्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

September 3, 2026
0
Blog

शरद जोशी यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

September 3, 2026
0
साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे.
Blog

साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे.

September 3, 2026
4
🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️
Blog

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026
0
Next Post
साई विद्यालय, वंधली येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा

साई विद्यालय, वंधली येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

🦚🪈 परमार्थ निकेतनमध्ये भजनाने रंगणार श्रीकृष्ण जन्मोत्सव! 🪈

September 3, 2026

NCMC कार्ड सक्तीमुळे सॉफ्टवेअर त्रुटी व टॉप-अप न झाल्याने लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोय बद्ल नाराजी व्यक्त

September 3, 2026

अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी ५० हजार अनुदान द्याश्री शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुक्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In