नागपूर–हैदराबाद महामार्गावरील देवधरी घाटात अपघात; रस्त्यावर पडलेली मिरची हटवून वाहतूक सुरळीत
यवतमाळ : नागपूर–हैदराबाद महामार्गावरील देवधरी घाट परिसरात एका वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली. अपघातानंतर वाहनातील तब्बल ३ टन मिरची रस्त्यावर पडली, त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या वाहनातून तीन जण प्रवास करत होते. त्यापैकी दोन जण बचावले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच देवा ग्रुप फाऊंडेशन, यवतमाळ येथील कार्यकर्त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेली मिरची बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मदत केली.
अपघाताच्या ठिकाणी प्रसंगावधान राखून करण्यात आलेल्या मदतीमुळे बचावकार्याला हातभार लागला तसेच महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यास मदत झाली.
देवा ग्रुप फाऊंडेशनच्या यवतमाळ येथील कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेचे परिसरातून कौतुक होत आहे.
समाजसेवा, माणुसकी आणि संकटाच्या काळात मदतीसाठी धावून जाण्याची वृत्ती — हाच देवा ग्रुप फाऊंडेशनचा संकल्प!
🚩 जय देवा! 🚩








