आमदार डॉ. राहुलदादा आहेर यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
चांदवड | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी नाशिक उत्तरची संघटनात्मक बैठक चांदवड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. आगामी काळातील पक्षाचे संघटनात्मक कार्य, बूथ स्तरावरील संघटन अधिक मजबूत करणे तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार डॉ. राहुलदादा आहेर यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. पक्षाची विचारधारा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
“भाजपची खरी ताकद ही संघटनेत आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीत आहे. प्रत्येक बूथ सक्षम करून जनतेशी सातत्याने संपर्क ठेवणे हीच आगामी काळातील आपली प्रमुख जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुलदादा आहेर यांनी यावेळी केले.
बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक विस्तारासह आगामी उपक्रमांचे नियोजन, कार्यकर्त्यांशी समन्वय, बूथनिहाय आढावा आणि पक्षाचे काम अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीमुळे नाशिक उत्तर मतदारसंघातील भाजपच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असून आगामी काळातील पक्षाच्या विविध उपक्रमांसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
