• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

झरंडी गावात मातृशक्तीचा अवैध दारूविरोधात एल्गार; महिलांनी एकजुटीने दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 9, 2026
in Blog
0
झरंडी गावात मातृशक्तीचा अवैध दारूविरोधात एल्गार; महिलांनी एकजुटीने दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले.
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

प्रदीप ताजने
पातुर प्रतिनिधी

RelatedPosts

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद

गट ग्रामपंचायत सगनापूर,चा भोंगळ कारभार………… मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…. 🖊️..

गावात वाढत्या अवैध दारूविक्रीमुळे त्रस्त झालेल्या झरंडी गावातील मातृशक्तीने अखेर आक्रमक पवित्रा घेत अवैध दारूविरोधात एल्गार पुकारला आहे. महिलांनी एकजूट दाखवत गावातील अवैध दारूचे अड्डे थेट उद्ध्वस्त केले. महिलांच्या या धाडसी भूमिकेचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे.

पातूर तालुक्यातील झरंडी गावात गेल्या काही महिन्यांपासून अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात वाढली होती. दारूच्या व्यसनामुळे गावातील अनेक लहान मुले व्यसनाच्या आहारी जात असून अनेक कुटुंबांमध्ये दररोज कौटुंबिक कलह, भांडणे आणि आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून या परिस्थितीचा सर्वाधिक त्रास महिला आणि त्यांच्या मुलांना सहन करावा लागत असल्याची व्यथा महिलांनी मांडली.

या रोजच्या त्रासाला कंटाळून गावातील महिलांनी एकत्र येत गाव दारूमुक्त करण्याचा निर्धार केला आणि थेट अड्ड्यांवर धडक दिली.

महिलांची एकजूट चर्चेचा विषय

या मोहिमेत मंगलाबाई हांडे, बेबीबाई ठाकरे, संगिता पांडे, फुलाबाई हांडे, सुंदाबाई हांडे, पद्मिनीबाई ठाकरे, परबाबाई चव्हारे, कल्पनाबाई लताड, इंदूबाई शिंदे, लीलाबाई कांडकर, वंदना लताड, नादबाई पांडे यांच्यासह सुभाष राठोड, विक्रम जाधव, अनिल ठाकरे आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

“दारूमुळे आमच्या कुटुंबांचे आणि मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. दारूमुक्त झरंडी, सुरक्षित कुटुंब आणि उज्ज्वल भविष्य हाच आमचा उद्देश आहे,” अशी आक्रमक भावना महिलांनी व्यक्त केली.

महिलांनी उचललेले हे पाऊल केवळ आंदोलन नसून गावातील कुटुंबव्यवस्था आणि पुढील पिढी वाचवण्यासाठीची सामाजिक चळवळ असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या घटनेनंतर अवैध दारूविक्रीवर प्रशासनानेही कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

कॉलम – प्रतिक्रिया
“गावातील मातृशक्ती समोर आली तर प्रत्येक गावात दारूबंदी होऊ शकते, हे उंबरवाडी आणि झरंडी या दोन गावांनी सिद्ध करून दाखवले आहे.”
– निलेश तोताराम कापकर, सामाजिक कार्यकर्ते

Previous Post

पारगावात शूरवीर जीवा महाले ,संत सेना महाराज पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न…!!

Next Post

सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्याचे आयपीएस अंजना कृष्णा यांचे आवाहन

Related Posts

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!
Blog

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

September 9, 2026
4
सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद
Blog

सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद

September 9, 2026
7
Blog

गट ग्रामपंचायत सगनापूर,चा भोंगळ कारभार………… मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…. 🖊️..

September 9, 2026
0
डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा

1
पारगावात शूरवीर जीवा महाले ,संत सेना महाराज पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न…!!
Blog

पारगावात शूरवीर जीवा महाले ,संत सेना महाराज पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न…!!

September 9, 2026
2
Next Post
सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्याचे आयपीएस अंजना कृष्णा यांचे आवाहन

सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करण्याचे आयपीएस अंजना कृष्णा यांचे आवाहन

ताज्या बातम्या

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

लोणावळ्यात कन्स्ट्रक्शन साईटवर मोठी चोरी उघडकीस!

September 9, 2026
सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद

सप्तशृंगीगड-नांदुरी घाटमार्ग १७ दिवस बंद

September 9, 2026

गट ग्रामपंचायत सगनापूर,चा भोंगळ कारभार………… मारेगाव, प्रतिनिधी, प्रणय खैरे…. 🖊️..

September 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In