सारथी महाराष्ट्राचा न्यूज….. मारेगाव तालुक्यात येत असलेल्या ग्राम, सगनापूर ही गट ग्रामपंचायत असून, लढविण्यात आलेल्या निवडणूक आरक्षणा नुसार पदाकरिता जागा निघतात किंवा सभासद तयार होतात . आरक्षणाची बाजू धरून ग्रामपंचायत सदस्य तयार केले जातात परंतु कागदपत्रांची पडताळणी न करता सभासद तयार झाले, सरळ सोप्या भाषेत म्हणायचे झाले तर आरक्षणा नुसार सभासद न तयार करता तसेच त्याच्या कागदपत्रांची पडताळणी न करता सभासद तयार केले व हे सभासद मनमर्जी प्रमाणे कारभार चालवितात असा आरोप गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या नागरिकांनी आपल्या शब्दात कथित केला आहे. अश्या सभासदा विषयी सखोल पडताळणी करू संबंधित प्रशासनाने अपात्र उमेदवारास वगळावे अशी सर्वत्र मागणी व गट ग्रामपंचायत कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत प्रशासनासमोर नागरिकांनी आपली बाजू व्यक्त केली आहे.









