• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 10, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

“पक्षाने दाखविलेला विश्वास जनसेवा आणि संघटनबांधणीतून सार्थ ठरवू” — आदित्य घरत

उरण : प्रतिनिधी | दि. १० सप्टेंबर

RelatedPosts

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

सातारा बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचे २७ ऑक्टोबरपासून पाडकाम; एसटी प्रशासनाकडून खबरदारी

मुल्हेर येथे बालगोपाल कृष्ण रासक्रीडा महोत्सव उत्साहात साजरा!

उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे कार्यकर्ते व कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे विश्वासू सहकारी आदित्य यशवंत घरत यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते आदित्य घरत यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

निवडीनंतर आदित्य घरत यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्येष्ठ नेते महेंद्रशेठ घरत तसेच पक्षातील सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. ही निवड केवळ पदाची जबाबदारी नसून काँग्रेस पक्षाची विचारधारा, लोकशाही मूल्ये आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

उरण तालुक्यात काँग्रेस पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच जनतेच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचे आदित्य घरत यांनी सांगितले. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

“माझ्यावर दाखविलेला विश्वास जनसेवा, संघटनबांधणी आणि लोकहिताच्या कार्यातून सार्थ ठरविण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन. पक्षाचे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि जनतेचे मार्गदर्शन व साथ हीच माझी खरी ताकद आहे,” असा विश्वास आदित्य यशवंत घरत यांनी व्यक्त केला.

आदित्य घरत यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रियपणे काम केले असून पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सातत्याने सहभाग घेतला आहे. त्यांच्या निवडीमुळे उरण तालुका काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त होत आहेत.

Ad 1
Tags: Vithal Mamatabade
Previous Post

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

Next Post

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

Related Posts

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

October 26, 2026
3
सातारा बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचे २७ ऑक्टोबरपासून पाडकाम; एसटी प्रशासनाकडून खबरदारी
ताज्या घडामोडी

सातारा बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचे २७ ऑक्टोबरपासून पाडकाम; एसटी प्रशासनाकडून खबरदारी

October 26, 2026
1
मुल्हेर येथे बालगोपाल कृष्ण रासक्रीडा महोत्सव उत्साहात साजरा!
ताज्या घडामोडी

मुल्हेर येथे बालगोपाल कृष्ण रासक्रीडा महोत्सव उत्साहात साजरा!

October 26, 2026
1
नाशिकमध्ये अहिल्या रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न!
ताज्या घडामोडी

नाशिकमध्ये अहिल्या रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न!

October 26, 2026
15
‘यंवद्या रे यंवद्या, वाघ्याची घेर वाघे!’; आदिवासी परंपरेचा गावोगावी जागर
ताज्या घडामोडी

‘यंवद्या रे यंवद्या, वाघ्याची घेर वाघे!’; आदिवासी परंपरेचा गावोगावी जागर

October 26, 2026
4
३ हजार पक्ष्यांपासून सुरू झालेला प्रवास; स्वप्नील पोल्ट्रीचे संस्थापक अरुण पवार ‘शिवनिश्चल पुरस्कारा’ने सन्मानित
ताज्या घडामोडी

३ हजार पक्ष्यांपासून सुरू झालेला प्रवास; स्वप्नील पोल्ट्रीचे संस्थापक अरुण पवार ‘शिवनिश्चल पुरस्कारा’ने सन्मानित

October 26, 2026
68
Next Post

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

ताज्या बातम्या

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

October 26, 2026
सातारा बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचे २७ ऑक्टोबरपासून पाडकाम; एसटी प्रशासनाकडून खबरदारी

सातारा बसस्थानकाच्या जुन्या इमारतीचे २७ ऑक्टोबरपासून पाडकाम; एसटी प्रशासनाकडून खबरदारी

October 26, 2026
मुल्हेर येथे बालगोपाल कृष्ण रासक्रीडा महोत्सव उत्साहात साजरा!

मुल्हेर येथे बालगोपाल कृष्ण रासक्रीडा महोत्सव उत्साहात साजरा!

October 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In