• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चामोर्शीत आज भव्य तान्हापोळा उत्सव; ‘चामोर्शी रत्न पुरस्कार’ ठरणार मुख्य आकर्षण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 10, 2026
in Blog
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

बालगोपालांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन; विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसांसह प्रत्येक स्पर्धकाला भेटवस्तू

चामोर्शी : प्रतिनिधी

RelatedPosts

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

चामोर्शी शहरात बालगोपालांसाठी सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता भव्य ‘तान्हापोळा उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा आठवडी बाजार चौक, नगरपंचायतसमोर, चामोर्शी येथे होणार आहे.

या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ‘चामोर्शी तालुक्यातील प्रथम चामोर्शी रत्न पुरस्कार’ हे असणार आहे. यासोबतच बालकांसाठी वयोगटानुसार दोन विविध थीमवर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.

गट ‘अ’ : १ ते ६ वर्षे

या गटासाठी ‘गडचिरोली जिल्ह्यातील संस्कृती’ ही थीम ठेवण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी ₹६,००१, द्वितीय क्रमांकासाठी ₹५,००१ आणि तृतीय क्रमांकासाठी ₹२,५०१ अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम बक्षीस किशोर ओल्लालवार, द्वितीय बक्षीस सोनाली पिपरे आणि तृतीय बक्षीस शुभम एंटरप्रायजेस, चामोर्शी यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

गट ‘ब’ : ७ ते १४ वर्षे

या गटासाठी ‘रस्ते सुरक्षा’ ही थीम निश्चित करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी ₹७,००१, द्वितीय क्रमांकासाठी ₹५,००१ आणि तृतीय क्रमांकासाठी ₹३,००१ अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. ही बक्षिसे अनुक्रमे रितेश पालारपवार, कविश्वरराव आईंचवार आणि सूरज प्रकाश शिवनीवार यांच्या वतीने देण्यात येणार आहेत.

याशिवाय सहभागी होणाऱ्या प्रत्येक बाल स्पर्धकाला राजा गोपिचंद किराणा यांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. कार्यक्रम वेळेत सुरू करण्यात येणार असून, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते अमोल आईंचवार, नगरसेविका प्रेमाताई आईंचवार, रमेश अधिकारी, यशवंत त्रिकोडे आणि माधवी पेशट्टीवार हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. चामोर्शी शहरातील नागरिकांनी आपल्या बालगोपालांना नंदीबैलासह या पारंपरिक सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी करून घ्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Previous Post

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

Next Post

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

Related Posts

Blog

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026
0
Blog

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026
7
Blog

देवीभोयरे येथील युवा उद्योजक अतुल मुळे यांची शिवसेना उपजिल्हा संघटकपदी निवड

September 10, 2026
2
Blog

दक्षिण रायगड भाजप महिला मोर्चाची जिल्हास्तरीय मंगळागौर स्पर्धा उत्साहात

September 10, 2026
0
Blog

कोपरल्ली माल येथील बंद सोलर पंप योजना तातडीने सुरू करा; अन्यथा घागर मोर्चाचा इशारा

September 10, 2026
4
Blog

धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; आमदार तानाजी सावंत यांचे शासनाकडे निवेदन

September 10, 2026
3
Next Post

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In