• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन,पावणे पाच कोटींच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 11, 2026
in Blog
0
खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन,पावणे पाच कोटींच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य उभी राहावी मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी-

RelatedPosts

रिसोड शहरातलं 10 दिवसात नंतर एकदा पाणी पुरवठा होतो तो कमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

म्हसळा-रायगड
खासदार सुनील तटकरे व महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रशासकीय मान्यता मिळालेल्या म्हसळा पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.सुमारे पावणे पाच कोटी रुपये खर्चाच्या या अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी तटकरे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की,“स्मशानभूमी असो किंवा पोलीस ठाणे अशा विकासकामांचे भूमिपूजन किंवा लोकार्पण करताना आपण शुभेच्छा तरी काय देणार ? इमारत उत्तम व्हावी,पोलीस प्रशासनाचे काम चांगले चालावे मात्र नागरिकांना पोलीस ठाण्यात येण्याची वेळच कमी यावी हीच अपेक्षा आहे असे मार्मिक मत त्यांनी व्यक्त केले. येथे शिवसृष्टी उभारण्याचे काम असल्याने मोठ्या प्रमाणात मांगल्य आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकाला लागूनच उभारण्यात येणारी ही नवीन पोलिस ठाण्याचे इमारतीमुळे म्हसळा शहराच्या सौंदर्यात व वैभवात निश्चितच भर पडणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले.इमारतीच्या बांधकामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे स्पष्ट करत तटकरे यांनी संबंधित ठेकेदार व कंपनीच्या प्रतिनिधींना त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या.आपल्या सार्वजनिक जीवनातील विविध जबाबदाऱ्यांचा उल्लेख करताना तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या विविध शासकीय व लोकपयोगी प्रकल्पांची आठवण करून दिली. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष,राज्याचे अर्थमंत्री तसेच पालकमंत्री म्हणून काम करताना अनेक विकासकामे करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले..

रायगड जिल्ह्यात पोलिसांच्या सेवेसाठी ११० वाहने उपलब्ध करून देण्यात आली, तसेच म्हसळा येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आणि श्रीवर्धन येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. श्रीवर्धन तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, नगरपरिषद इमारत,म्हसळा बसस्थानक,पंचायत समिती इमारत,म्हसळा नगरपंचायत इमारत आणि शिवसृष्टी यांसारखी विविध विकासकामे सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.पोलीस प्रशासनाला आवाहन करताना तटकरे यांनी गुन्ह्यांचा अधिक खोलवर जाऊन तपास करण्याची गरज व्यक्त केली.विशेषतः संवेदनशील घटना घडल्यास पोलिसांनी संवेदनशील पद्धतीने तपास करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.मी कधीही गुन्हेगारी प्रवृत्तीचे समर्थन केले नाही आणि यापुढेही करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

पोलीस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद व विश्वासाचे नाते निर्माण झाले पाहिजे असे सांगत तटकरे यांनी कायदा-सुव्यवस्था राखण्यासोबतच नागरिकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचे आवाहन पोलिसांना केले.यावेळी उपअधीक्षक पवार, उपविभागीय अधिकारी योगिता कुटे सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर बनकर,माजी सभापती अध्यक्ष नाझिम हसवारे, सभापती बबन मनवे,जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे, जिल्हा परिषद सदस्य अनिल बसवत,नगराध्यक्ष सुनील शेडगे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, उपसभापती लहू म्हात्रे,पंचायत समिती सदस्या प्रियंका निंबरे, समृद्धी चाचले,महिला अध्यक्षा मीना टिंगरे,गटनेते संजय कर्णिक, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे,यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.शेवटी खासदार म्हणून विकासकामांसाठी केंद्रातील निधीची कमतरता पडणार नाही याच बरोबर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचे सांगत खासदार सुनील तटकरे यांनी त्यांचे आभार मानले.

Previous Post

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ब्रम्हपुरी आणि चिमुर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पदवीधर मतदार नोंदणीचा सविस्तर आढावा घेतला.

Next Post

धर्मपुरी ग्रामपंचायतीचा ‘अजब’ प्रकार; ग्रामसभा मंजुरीपूर्वीच १६वा वित्त आयोगाचा आराखडा ऑनलाइन

Related Posts

Blog

रिसोड शहरातलं 10 दिवसात नंतर एकदा पाणी पुरवठा होतो तो कमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

September 11, 2026
0
मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Blog

मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

September 11, 2026
33
आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.
Blog

आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

September 11, 2026
4
गोरनाळे येथे बैल पोळ्याचा मान श्री. उखर्डू काशिनाथ पाटील यांच्या बैलास
Blog

गोरनाळे येथे बैल पोळ्याचा मान श्री. उखर्डू काशिनाथ पाटील यांच्या बैलास

September 11, 2026
1
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीचा ‘अजब’ प्रकार; ग्रामसभा मंजुरीपूर्वीच १६वा वित्त आयोगाचा आराखडा ऑनलाइन

September 11, 2026
5
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ब्रम्हपुरी आणि चिमुर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पदवीधर मतदार नोंदणीचा सविस्तर आढावा घेतला.
Blog

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ब्रम्हपुरी आणि चिमुर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत पदवीधर मतदार नोंदणीचा सविस्तर आढावा घेतला.

September 11, 2026
13
Next Post

धर्मपुरी ग्रामपंचायतीचा ‘अजब’ प्रकार; ग्रामसभा मंजुरीपूर्वीच १६वा वित्त आयोगाचा आराखडा ऑनलाइन

ताज्या बातम्या

रिसोड शहरातलं 10 दिवसात नंतर एकदा पाणी पुरवठा होतो तो कमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

September 11, 2026
मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपले; गणपतरावजी मोहिते-पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली

September 11, 2026
आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

आगामी गणेशोत्सव २०२६ पार्श्वभूमीवर शांततामय सुरक्षित वाहतूक सुरळीत चालू राहण्यासाठी मा.पोलीस महानिरीक्षक श्री.चंद्रकिशोर मिना यांनी रायगड जिल्ह्यात दिली सदिच्छा भेट.

September 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In