ग्रामपंचायत सदस्य भारत डबडे यांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार; सखोल चौकशीसह फौजदारी कारवाईची मागणी
माळशिरस : धर्मपुरी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) ग्रामपंचायतीमध्ये १६वा वित्त आयोगाच्या निधीचा आराखडा ग्रामसभेसमोर मंजुरीसाठी मांडण्यापूर्वीच ऑनलाइन सादर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत सदस्यांना मासिक सभेमध्ये कोणतीही माहिती न देता तसेच ग्रामसभा घेऊन मंजुरीचा ठराव करण्यापूर्वीच आराखडा ऑनलाइन करण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य श्री. भारत तुकाराम डबडे यांनी केला आहे.
या प्रकरणी डबडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी, पंचायत समिती माळशिरस यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून सखोल चौकशीची मागणी करणार आहेत. तसेच चौकशीमध्ये खोटी माहिती, बनावट ठराव, खोटी स्वाक्षरी किंवा शासनाची दिशाभूल केल्याचे आढळल्यास लागू कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्याची मागणीही करण्यात येणार आहे.
१६वा वित्त आयोगाचा आराखडा तयार करताना ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये सदस्यांना प्रस्तावित कामे, त्यांचा प्राधान्यक्रम, अंदाजित खर्च किंवा आराखड्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यावर विधिवत चर्चा करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत मासिक सभेची नोटीस, अजेंडा, उपस्थितीपत्रक, इतिवृत्त व ठराव रजिस्टर तपासण्याची मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ग्रामसभेने कोणती कामे घ्यावीत, त्यांचा प्राधान्यक्रम काय असावा किंवा आराखड्यामध्ये आवश्यक बदल कोणते करावेत, याबाबत निर्णय होण्यापूर्वीच आराखडा ऑनलाइन सादर करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे ग्रामसभेच्या निर्णयप्रक्रियेला डावलण्यात आले का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
आराखडा ऑनलाइन भरताना नमूद करण्यात आलेला ठराव क्रमांक, ठराव दिनांक आणि ग्रामसभा दिनांक यांची मूळ ग्रामपंचायत रजिस्टरशी पडताळणी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच संबंधित आराखडा कोणत्या Login/User ID वरून, कोणत्या तारखेला व किती वाजता सादर करण्यात आला,








