ब्रह्मपुरी,(ता.प्र.)दि.९ सप्टेंबर २०२६
प्रत्येक पात्र सुशिक्षित पदवीधराचे नाव मतदार यादीत समाविष्ट व्हावे, यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी गावोगावी आणि शहरातील प्रत्येक भागात जाऊन नोंदणी मोहीम अधिक गतिमान करावी, अशा सूचना या वेळी दिल्या. पदवीधरांचे हक्क आणि विकासाचे प्रश्न मांडण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्वांनी पूर्ण ताकदीने आणि समन्वयाने कामाला लागावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.
यावेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार, आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डॉ थानेश्वर कायरकर,अनु.जाती विभाग प्रदेश सरचिटणीस डॉ. राजेश कांबळे, प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग उपाध्यक्ष धनराज मुंगले, प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस सौ.सिमाताई सहारे,सिंदेवाही तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे, ब्रम्हपुरी तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, सावली तालुकाध्यक्ष नितीन गोहणे,नागभिड तालुकाध्यक्ष प्रमोद चौधरी,चिमुर तालुकाध्यक्ष गावंडे व ब्रम्हपुरी आणि चिमुर विधानसभा मतदारसंघातील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.








