🚨 महा सारथी | ब्रेकिंग न्यूज
फुलसावंगी, ता. महागाव, जि. यवतमाळ : आज यात्रेदरम्यान झुल्यात बसलेल्या एका महिलेच्या डोक्यावरील केस झुल्याच्या यंत्रणेत अडकल्याने धक्कादायक घटना घडली. केस अडकल्याने ते ओढले गेल्यामुळे महिलेला दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
📍 घटनास्थळ: फुलसावंगी, ता. महागाव, जि. यवतमाळ
📅 दिनांक: ११ सप्टेंबर २०२६
महा सारथी न्यूज | जनतेचा आवाज









