• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 12, 2026
in Blog
0
सहकार्याच्या सावलीतला माणूस…!वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा
0
SHARES
12
VIEWS
Ad 1

प्रिय संजूभाऊ,
स.न.वि.वि.

RelatedPosts

चांभुर्डी – विसापूर रस्त्याच्या उर्वरित 500 मीटर कामाला अखेर सुरवात , ” क्वालिटी इज इक्वल टू प्रीतम भंडारी ” ठेकेदाराचा दावा

विद्यार्थ्यांच्या दाखल्यातील त्रुटीमुळे शिक्षण बाधित होऊ नये; रिपाइं व मानव सेवा फाउंडेशनची शासनाकडे राज्यस्तरीय परिपत्रक काढण्याची मागणी

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

विद्यालय म्हणजे केवळ वर्गखोल्या, फळा, पुस्तके आणि विद्यार्थी नव्हेत; तर तेथील प्रत्येक माणसाच्या योगदानातून विद्यालयाचे एक सुंदर कुटुंब तयार होत असते. या कुटुंबात काही व्यक्ती आपल्या पदामुळे नव्हे, तर आपल्या माणुसकीमुळे मोठ्या होतात. अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे विद्यालयातील सहकारी, मार्गदर्शक, मित्र आणि सदैव मदतीसाठी तत्पर असलेले वरिष्ठ लिपिक श्री. संजय वराडे जी.
संजय वराडे हे नाव घेताच डोळ्यांसमोर येते ते एक हुशार, संयमी, आपुलकीचे आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व. कोणाशीही कटुता नाही, कुणाविषयी द्वेष नाही आणि आपल्या शब्दांनी किंवा वागण्याने कुणाचे मन दुखावू नये, याची सदैव जाणीव ठेवणारा माणूस. म्हणूनच आपल्या सहवासात आलेल्या प्रत्येकाच्या मनात आपल्याविषयी आदर आणि जिव्हाळा निर्माण होतो.

विद्यालयीन कामकाजात वरिष्ठ लिपिक म्हणून आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कागदपत्रे, कार्यालयीन प्रक्रिया, नोंदी आणि विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना आपला अनुभव, शिस्त आणि कामातील बारकावे समजून घेण्याची वृत्ती नेहमीच जाणवते. मात्र आपल्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख केवळ पदात नाही; ती आहे माणूस म्हणून असलेल्या मोठेपणात.
काही प्रशासनिक व तांत्रिक कारणांमुळे जरी आपण आमच्या विद्यालयातून तात्पुरत्या कालावधीकरिता दूर गेले असलात, तरी आपण अजूनही सदैव आमच्यासोबतच आहात. अडचण कोणाचीही असो, काम कोणतेही असो किंवा मदतीची गरज कुणालाही भासो,
“काय अडचण आहे? पाहूया..सब ठीक हो जाएगा ”
अशा आपुलकीच्या शब्दांनी धीर देणारा माणूस म्हणजे संजय वराडे.
आपल्या मदतीला कधी औपचारिकतेची चौकट नसते आणि उपकाराची जाणीव करून देण्याची सवयही नाही. मदत करणे हा आपल्यासाठी उपकार नसून माणुसकीचा सहज स्वभाव आहे. म्हणूनच आपल्यासोबत काम करताना सहकाऱ्याला एक वेगळाच विश्वास वाटतो की, आपल्या अडचणीच्या वेळी कुणीतरी आपल्यासोबत उभे आहे.

आपण आमच्याकरिता केवळ विद्यालयातील सहकारी नाहीत, तर मार्गदर्शक आहात, विश्वासू मित्र आहात आणि सुख-दुःखात मनमोकळेपणाने संवाद साधता येईल अशी आपली माणूसकीची व्यक्ती आहात. आपल्या अनुभवातून मिळणारे मार्गदर्शन अनेकदा एखाद्या मोठ्या पुस्तकापेक्षा अधिक मोलाचे वाटते; कारण त्यामागे असतो तो अनुभवाचा गंध आणि आपुलकीची ऊब.
आपल्या व्यक्तिमत्त्वाची आणखी एक सुंदर बाजू म्हणजे अजातशत्रुत्व. प्रत्येकाशी जुळवून घेणे, मतभेदांना मनभेद होऊ न देणे आणि नात्यांमध्ये गोडवा जपणे ही कला प्रत्येकाला जमत नाही. पण आपण ती आपल्या स्वभावातून सहज आत्मसात केली आहे.

आपल्या सहवासात आल्यावर जाणवते की, माणसं जिंकण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची गरज नसते; मन स्वच्छ आणि वागणं निर्मळ असलं की माणसं आपोआप जोडली जातात.
संजय नावातच जणू विजयाचा स्पर्श आहे; पण आपल्या आयुष्यातील खरा विजय हा पद, प्रतिष्ठा किंवा संपत्तीचा नसून आपण जपलेल्या माणसांच्या नात्यांचा आहे.आपल्या भोवती असलेली माणसं हीच आपल्या आयुष्याची खरी कमाई आहे.
आज आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना मनापासून एकच वाटते,
आपल्या आयुष्यात काही माणसं अशी असतात की, त्यांच्या उपस्थितीनेच वातावरणात विश्वास, आधार आणि आपलेपणा निर्माण होतो. श्री. संजय वराडे हे त्यापैकीच एक.
ईश्वरचरणी प्रार्थना की, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंदाने उजळून निघो. उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समाधान आणि यश लाभो.आपल्या चेहऱ्यावरचे हास्य असेच कायम राहो आणि आपल्या हातून माणुसकीची सेवा अशीच घडत राहो.

आपण सहकारी म्हणून लाभलात,
मार्गदर्शक म्हणून लाभलात,
मित्र म्हणून लाभलात—
ही आमच्यासाठी नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, संजय सर! 💐
आपला सहवास असाच लाभत राहो आणि मैत्रीच्या या सुंदर नात्याला काळाची कोणतीही सीमा पडू नये, हीच मनापासून सदिच्छा!

आपला सहकारी व मित्र,
श्री. मयूर भोंबे
(एम.ए.मराठी ; बी.एड्)
माध्य.शिक्षक, ग्रा.वि.वि.सालवा
9881529204
mayurbhombe@gmail.com

Previous Post

फुलसावंगी यात्रेत धक्कादायक घटना; झुल्यात महिलेचे केस अडकले

Next Post

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

Related Posts

चांभुर्डी – विसापूर रस्त्याच्या उर्वरित 500 मीटर कामाला अखेर सुरवात , ” क्वालिटी इज इक्वल टू प्रीतम भंडारी ” ठेकेदाराचा दावा
Blog

चांभुर्डी – विसापूर रस्त्याच्या उर्वरित 500 मीटर कामाला अखेर सुरवात , ” क्वालिटी इज इक्वल टू प्रीतम भंडारी ” ठेकेदाराचा दावा

September 12, 2026
0
विद्यार्थ्यांच्या दाखल्यातील त्रुटीमुळे शिक्षण बाधित होऊ नये; रिपाइं व मानव सेवा फाउंडेशनची शासनाकडे राज्यस्तरीय परिपत्रक काढण्याची मागणी
Blog

विद्यार्थ्यांच्या दाखल्यातील त्रुटीमुळे शिक्षण बाधित होऊ नये; रिपाइं व मानव सेवा फाउंडेशनची शासनाकडे राज्यस्तरीय परिपत्रक काढण्याची मागणी

September 12, 2026
2
चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…
Blog

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

September 12, 2026
1
Blog

फुलसावंगी यात्रेत धक्कादायक घटना; झुल्यात महिलेचे केस अडकले

September 12, 2026
3
मळद येथे ‘आमदार राहुल दादा कुल दहीहंडी चषक २०२६’ उत्साहात साजरा
Blog

मळद येथे ‘आमदार राहुल दादा कुल दहीहंडी चषक २०२६’ उत्साहात साजरा

September 12, 2026
2
‘आता कुठं जायचं, मुंबईला जायचं!’ घोषणेने माहूर दणाणले
Blog

‘आता कुठं जायचं, मुंबईला जायचं!’ घोषणेने माहूर दणाणले

September 12, 2026
2
Next Post
चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

ताज्या बातम्या

चांभुर्डी – विसापूर रस्त्याच्या उर्वरित 500 मीटर कामाला अखेर सुरवात , ” क्वालिटी इज इक्वल टू प्रीतम भंडारी ” ठेकेदाराचा दावा

चांभुर्डी – विसापूर रस्त्याच्या उर्वरित 500 मीटर कामाला अखेर सुरवात , ” क्वालिटी इज इक्वल टू प्रीतम भंडारी ” ठेकेदाराचा दावा

September 12, 2026
विद्यार्थ्यांच्या दाखल्यातील त्रुटीमुळे शिक्षण बाधित होऊ नये; रिपाइं व मानव सेवा फाउंडेशनची शासनाकडे राज्यस्तरीय परिपत्रक काढण्याची मागणी

विद्यार्थ्यांच्या दाखल्यातील त्रुटीमुळे शिक्षण बाधित होऊ नये; रिपाइं व मानव सेवा फाउंडेशनची शासनाकडे राज्यस्तरीय परिपत्रक काढण्याची मागणी

September 12, 2026
चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

चिंचोली (शिंगरु) येथे तान्ह्या पोळ्याचे उत्साहात आयोजन…

September 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In