श्रीगोंदा : प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील चांभुर्डी ते विसापूर या बहुप्रतिक्षित रस्त्याचे काम मंजूर होऊन काही काळापूर्वी पूर्ण झाले.मात्र तांत्रिक किंवा अन्य कारणामुळे या रस्त्यांमधील सुमारे ५०० मीटरचे काम अपूर्ण ठेवण्यात आले होते. या अर्धवट रस्त्यामुळे पावसाळ्यात स्थानिक नागरिक आणि वाहन धारकांना चिखल आणि खड्ड्यातून प्रवास करताना प्रचंड कसरत करावी लागत होती. अखेर या उर्वरित कामाला नव्याने मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी मोठा सुटकेचा श्वास सोडला असून समाधान व्यक्त केले.
” क्वालिटी इज इक्वल टू प्रीतम भंडारी ” – ठेकेदाराचा फोनवरवठाम विश्वास
या सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत आणि सविस्तर माहीतीसाठी आमच्या प्रतिनिधीने थेट संबंधित ठेकेदाराशी फोनवर संपर्क साधला. कामाच्या गुणवत्तेबाबत विचारणा केली असता ठेकेदाराने अत्यंत आत्मविश्वासने ब सांगितले की,” कामाच्या बाबतीत कुठलीही अडचण येणार नाही ,आम्ही उत्तम दर्जाचे (क्वालिटी ) काम करणार “
आपल्या कामाच्या गुणवत्तेची हमी देताना ठेकेदाराने पुढे एक महत्वाचे विधान केले ” क्वालिटी इज इक्वल टू प्रीतम भंडारी ( Quality is equal to Pritam Bhandari ), हे खात्यातील ( सार्वजनिक बांधकाम विभाग ) सर्व लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे .” ठेकेदाराच्या या विधानामुळे आता या ५०० मीटर रस्त्याचे काम खरोखरच उत्कृष्ट दर्जाचे होणार ,अशी आशा व्यक्त केली जात आहे.
दर्जेदार कामाकडे नागरिकांचे लक्ष
मागील काही दिवस चिखल आणि खड्ड्यांचा जाच सहन केल्यानंतर आता हक्काचा आणि पक्का रस्ता मिळत असल्याने चांभुर्डी व विसापूर परिसरातील ग्रामस्थ आनंदित आहे. मात्र ठेकेदाराने फोनवर दिलेल्या ” प्रीतम भंडारी क्वालिटी ” च्या शब्दाला जागून हे काम प्रत्यक्षात तेव्हढ्याच मजबूत दर्जाचे करतात का,याकडे आता संपूर्ण परिसरातील नागरिकांचे आणि प्रशासनाचे बारीक लक्ष लागून राहिले आहे.










