महागाई, दुष्काळाच्या सावटातही
रिसोड (प्रतिनिधी ) डि.नगरकर सारथी महाराष्ट्राचा न्यूज
नात्याचा सन्मान करणारा पारंपरिक बैलपोळा सण रिसोड शहरात गुरुवारी (१० सप्टेंबर) सायंकाळी अत्यंत उत्साहात पार पडला. शहरातील अष्ट पूजा माता चौक गुजरी चौक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पोळा भरविण्यात आला होता. शहर व परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना आकर्षक रीतीने सजवून या उत्सवात सहभाग घेतला.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
पोळा उत्सव साजरा चौकाचौकात कडक बंदोबस्त तैनात केला होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संपूर्ण उत्सव शांततेत व पारंपरिक आनंदाच्या वातावरणात पार पडला.






