• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पुढाकार; हजारो किलो निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीचा उपक्रम

कळंबोली प्रतिनिधी | : गणेश विसर्जनादरम्यान जलप्रदूषण रोखण्याबरोबरच परिसराची स्वच्छता राखण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली-रोडपाली व कामोठे येथील विसर्जन घाटांवर भव्य ‘निर्माल्य संकलन अभियान’ राबविण्यात आले. तीर्थरूप पद्मश्री, महाराष्ट्र भूषण आदरणीय डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि तीर्थरूप रायगड भूषण डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

RelatedPosts

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

गणेश विसर्जनाच्या वेळी भाविकांकडून फूल, हार तसेच विविध पूजासाहित्य जलाशयांमध्ये विसर्जित केले जाते. त्यामुळे जलप्रदूषणाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी कळंबोली-रोडपाली परिसरातील विसर्जन तलावाजवळ निर्माल्य संकलन केंद्रे उभारली होती.

विसर्जनाच्या दिवशी दुपारपासूनच श्री सदस्य हातात ग्लोव्हज व गोण्या घेऊन विसर्जनस्थळी तैनात होते. गणेशभक्तांनी निर्माल्य पाण्यात न टाकता संकलन केंद्रांमध्ये जमा करावे, असे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला नागरिक आणि गणेशभक्तांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

संकलित निर्माल्याचे शास्त्रोक्त वर्गीकरण

संकलित निर्माल्यामधून प्लास्टिक, थर्माकोल तसेच इतर न कुजणारा कचरा वेगळा करण्यात आला. त्यानंतर नैसर्गिक फुलांचे निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करण्यात आले. संकलित करण्यात आलेल्या हजारो किलो निर्माल्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी त्यापासून सेंद्रिय खत अर्थात ऑरगॅनिक कम्पोस्ट तयार करण्यात येणार आहे.

तयार होणाऱ्या या सेंद्रिय खताचा वापर प्रतिष्ठानच्या वतीने फणसवाडी-वलप येथे करण्यात आलेल्या वृक्षारोपणासह विविध सामाजिक वृक्षारोपण मोहिमांमध्ये लावण्यात आलेल्या झाडांसाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवातील निर्माल्याचे रूपांतर पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त साधनात होणार आहे.

या पर्यावरणपूरक उपक्रमामुळे पनवेल महानगरपालिका तसेच स्थानिक प्रशासनावरील कचरा व्यवस्थापनाचा ताण कमी होण्यासही मदत झाली. जलप्रदूषण रोखण्यासोबतच स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी तसेच गणेशभक्तांकडून कौतुक करण्यात आले. प्रतिष्ठानच्या सर्व श्री सदस्यांचे या सामाजिक व पर्यावरणपूरक कार्यासाठी विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

Tags: Shrinath Laad
Previous Post

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

Related Posts

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात
ताज्या घडामोडी

पर्लकोटा नदीच्या पुरात एसडीआरएफचा मदतीचा हात

September 26, 2026
0
वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
ताज्या घडामोडी

वडूजमध्ये तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

September 25, 2026
40
ताज्या घडामोडी

महामार्गावरील दुभाजक ठरतोय अपघातांना निमंत्रण

September 25, 2026
14
धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात
ताज्या घडामोडी

धान पिकावरील रोगराई व किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी संकटात

September 25, 2026
16
दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ताज्या घडामोडी

दुष्काळ परिस्थितीबाबत ३० सप्टेंबरनंतरच पुढील मूल्यांकन; पाऊस व पीकस्थितीच्या अचूक नोंदी ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

September 25, 2026
8
नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात
ताज्या घडामोडी

नवेगाव येथे सिद्धीविनायक गणेश मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात

September 24, 2026
7

ताज्या बातम्या

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

गणेश विसर्जनात पर्यावरण संवर्धनाचा जागर; कळंबोलीत निर्माल्य संकलन अभियान

September 26, 2026
कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

कळंबोलीतील भेसळीविरोधातील जिवंत देखाव्याला ‘न्यूज 18 मराठी’चे प्रथम पारितोषिक

September 26, 2026
जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

जळकोट शहरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 26, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In