अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती आणि धम्मविचारांचा प्रसार करण्याचा कार्यकर्त्यांना संदेश
वाशी प्रतिनिधी | दि. २६ सप्टेंबर २०२६ : भारतीय बौद्ध महासभा, वाशी तालुक्याच्या वतीने तेरखेडा (ता. वाशी) येथे एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात जिल्हा संघटनेचे ॲड. दिलीप निकाळजे सर यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन बौद्ध उपासक, उपासिका तसेच बालकांना अंधश्रद्धेविषयी जनजागृती करावी, व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश द्यावा आणि धम्माचे विचार व आचार याबाबत मार्गदर्शन करावे, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला वाशी तालुका अध्यक्ष शुभम सरवदे, ॲड. धनश्री मगर, प्रियंका सरवदे, ज्योती साळवे, विजय साळवे, अजय साळवे यांच्यासह अनेक महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
यानंतर कडकनाथवाडी, बोरी आणि खानापूर येथे भेट देऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी आगामी कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच भारतीय बौद्ध महासभेची माहिती, उद्दिष्टे आणि कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला संबंधित गावांतील कार्यकर्ते व नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, आगामी काळात वाशी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याची माहिती देणे आणि धम्मविचारांचा प्रसार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.








