• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका शांततेत; गुलाल-धुळीमुळे नागरिक हैराण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहाद्यात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका शांततेत; गुलाल-धुळीमुळे नागरिक हैराण
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

शहरातील सुमारे ६५ गणेश मंडळांच्या मिरवणुका शिस्तबद्ध; रस्त्यांवरील गुलालाच्या थरामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाविरोधात नागरिकांचा रोष

शहादा, दि. २६ (प्रतिनिधी) :
“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात, सप्तरंगी गुलालाची उधळण आणि ढोल-ताशांच्या गजरात शहादा शहरातील गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुका भक्तिमय वातावरणात शांततेत पार पडल्या. बालके, महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत विविध गणेश मंडळांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणुका काढत गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

RelatedPosts

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन

शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवात शहरासह ग्रामीण भागात सकाळ-संध्याकाळ विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सुमारे ६५ नोंदणीकृत गणेश मंडळांनी उत्सवात सहभाग घेतला. एम.के. क्लब, सिंधिराजा, पटेल आणि त्रिमूर्ती गणेश मित्र मंडळाने आकर्षक आरास व देखावे सादर केले. तर अनेक मंडळांनी १८ ते २० फूट उंच भव्य गणेशमूर्तींची स्थापना केली होती.

शहरात ५वा, ७वा, ९वा दिवस तसेच अनंत चतुर्दशी अशा चार टप्प्यांत विसर्जन मिरवणुका पार पडल्या. हिंदू व्यायामशाळा, क्रांती, भोईराज, गणेशनगर सांस्कृतिक, तूप बाजार, वृंदावन नगर, हिंदवी, सुवर्णकार, शनेश्वर आणि वीर एकलव्य गणेश मंडळांसह अनेक मंडळांनी वेळेच्या मर्यादेचे पालन करत मिरवणुका पूर्ण केल्या.

गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, पोलीस उपअधीक्षक अशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

उपविभागीय प्रांताधिकारी दीपक गिरासे, तहसीलदार संभाजीराव पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्यासह भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्यामभाऊ जाधव, पालिका पदाधिकारी आणि शांतता समितीच्या सदस्यांनीही सहकार्य केले.

शहरातील विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस प्रशासन आणि शांतता समितीच्या सदस्यांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष नासिर पठाण, हाजी रफीक शेख नूरा, माजी नगरसेवक आरिफ मासूम पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना टेलर, रियाज कुरेशी, प्रा. मेहमूद खटीक आदींनी पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

दरम्यान, विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या असल्या तरी शहरातील रस्त्यांवर साचलेल्या गुलाल आणि धुळीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे. मुख्य मिरवणूक मार्गासह गुरव गल्ली, इक्बाल चौक तसेच चौधरी गल्ली ते हॉटेल सुख-शांती परिसरातील रस्त्यांवर गुलालाचे थर साचल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रात्रीच्या वेळी पालिका प्रशासनाकडून गुलाल गोळा करण्याचे काम सुरू असताना आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद झाल्याने काम थांबल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिणामी दिवसभर वाऱ्यासोबत गुलाल व धूळ उडत असल्याने ती दुकाने आणि घरांमध्ये शिरत आहे. त्यामुळे व्यापारी, पादचारी तसेच वाहनधारकांना डोळे आणि श्वसनासंबंधी त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.

विसर्जनानंतर शहरातील रस्त्यांची तातडीने स्वच्छता करून गुलाल व धुळीचा नागरिकांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकारामुळे शहादा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

श्री. पी. के. अण्णा पाटील फाउंडेशनचे पुरुषोत्तम पुरस्कार जाहीर

Next Post

शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

Related Posts

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन
ताज्या घडामोडी

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन

September 27, 2026
0
शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता
ताज्या घडामोडी

शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

September 27, 2026
0
हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू
ताज्या घडामोडी

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
19
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन
ताज्या घडामोडी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
16
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026
14
भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न
ताज्या घडामोडी

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

September 26, 2026
4
Next Post
शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

ताज्या बातम्या

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन

September 27, 2026
शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

September 27, 2026
शहाद्यात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका शांततेत; गुलाल-धुळीमुळे नागरिक हैराण

शहाद्यात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका शांततेत; गुलाल-धुळीमुळे नागरिक हैराण

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In