• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

अनंत चतुर्दशीला महिलांच्या गरबा, लेझीम व पारंपरिक नृत्याने वेधले लक्ष; बारा दिवस विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रम

शहादा, दि. २६ (प्रतिनिधी) :
शहादा शहरातील दीनदयाल नगर येथील श्री शिवछत्रपती ग्रुप निळकंठेश्वर मंदिर गणेशोत्सव २०२६ ची अनंत चतुर्दशीच्या दिवशी उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी महिला भाविकांनी विशेष तयारी केली होती. वाद्यांच्या तालावर महिलांच्या ग्रुपने गरबा, लेझीम आणि पारंपरिक नृत्याची सुरेख प्रात्यक्षिके सादर करत संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक करण्यात आले.

RelatedPosts

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन

शहाद्यात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका शांततेत; गुलाल-धुळीमुळे नागरिक हैराण

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

या निरोप सोहळ्यात शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ. माधवी मकरंद पाटील, नगरसेविका तथा शिक्षण सभापती सौ. भावना चंद्रभान कदम, सौ. प्रतिभा ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह सौ. रूपाली विजय चौधरी, सौ. प्रतिभा दीपक कोळी, सौ. पुनम संजीव क्षीरसागर, सौ. पुष्पा नितीन कोळी, सौ. भूमी लक्ष्मीकांत अग्रवाल, सौ. सुरेखा शिंदे, सौ. सुनीता भावसार, सौ. प्रियांका तांबोळी, सौ. स्नेहा तांबोळी, सौ. योगिता चौधरी, सौ. माधुरी चौधरी, सौ. शितल मराठे, सौ. अलका बडगुजर तसेच शिवछत्रपती महिला ग्रुप गणेश मंडळाच्या सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी शिवछत्रपती ग्रुपचे संस्थापक तथा शहादा नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, अध्यक्ष विजय चौधरी, पदाधिकारी लक्ष्मीकांत अग्रवाल, डॉ. चंद्रभान कदम, दिनेश तांबोळी, दीपक शिंदे, नितीन कोळी, संजय क्षीरसागर, दीपक कोळी आदींनी बारा दिवस विशेष परिश्रम घेतले.

गणेशोत्सवाच्या बारा दिवसांच्या कालावधीत ग्रुपच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करून आरतीचा मान देण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यशस्वी व नामवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. उत्सवाच्या कालावधीत ज्या सदस्यांचे वाढदिवस आले, त्यांचे वाढदिवसही मंडळाच्या वतीने उत्साहात साजरे करण्यात आले.

सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रमांसोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे विविध कार्यक्रमही ग्रुपच्या वतीने राबविण्यात आले. सत्यनारायण पूजन तसेच महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रमही भक्तिभावाने पार पडला. विविध उपक्रमांमुळे यंदाचा गणेशोत्सव परिसरातील नागरिकांसाठी सामाजिक सहभाग आणि उत्साहाचा केंद्रबिंदू ठरला.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहाद्यात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका शांततेत; गुलाल-धुळीमुळे नागरिक हैराण

Next Post

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन

Related Posts

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन
ताज्या घडामोडी

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन

September 27, 2026
0
शहाद्यात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका शांततेत; गुलाल-धुळीमुळे नागरिक हैराण
ताज्या घडामोडी

शहाद्यात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका शांततेत; गुलाल-धुळीमुळे नागरिक हैराण

September 27, 2026
0
हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू
ताज्या घडामोडी

हैद्राबाद–पूर्णा पॅसेंजरखाली आल्याने ८० वर्षीय महिलेचा मृत्यू

September 26, 2026
19
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन
ताज्या घडामोडी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात कर्मवीर जयंती समारंभाचे आयोजन

September 26, 2026
16
श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल
ताज्या घडामोडी

श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांच्या पनीरविषयक पाठपुराव्याची केंद्रस्तरावर दखल

September 26, 2026
13
भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न
ताज्या घडामोडी

भारतीय बौद्ध महासभेचे वाशी तालुक्यात एकदिवसीय शिबिर संपन्न

September 26, 2026
4
Next Post
शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन

ताज्या बातम्या

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन

शहादा बाजार समितीत विविध विकासकामांची पाहणी व भूमिपूजन

September 27, 2026
शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

शहाद्यात श्री शिवछत्रपती ग्रुपच्या गणेशोत्सवाची उत्साहात सांगता

September 27, 2026
शहाद्यात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका शांततेत; गुलाल-धुळीमुळे नागरिक हैराण

शहाद्यात गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका शांततेत; गुलाल-धुळीमुळे नागरिक हैराण

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In