• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

काम पूर्ण, पण सुरक्षेला ‘खो’! येवला-मनमाड रस्त्यावर पांढरे पट्टे गायब

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
काम पूर्ण, पण सुरक्षेला ‘खो’! येवला-मनमाड रस्त्यावर पांढरे पट्टे गायब
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

रस्त्याच्या कडा न दिसल्याने रात्री दुचाकीस्वारांची कसरत; कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने उपाययोजनेची मागणी

येवला/मनमाड, दि. २५ सप्टेंबर : येवला-मनमाड रस्त्याचे काम पूर्ण होऊन अनेक दिवस उलटले असतानाही रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आवश्यक असलेले पांढरे साईड पट्टे (White Side Lines) अद्याप मारण्यात आलेले नसल्याने वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रात्री आणि पहाटेच्या वेळी दुचाकीस्वारांना रस्त्याची कड ओळखणे कठीण जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

RelatedPosts

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

कर्तव्याच्या वर्दीत राहूनही पोलिसांनी अनुभवला गणेशोत्सवाचा आनंद

या मार्गावर आधीच धुळीचा त्रास होत असून रस्त्याच्या कडा स्पष्ट दिसत नसल्याने वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशझोतामुळे रात्रीच्या वेळी रस्त्याची सीमा स्पष्ट न दिसण्याची समस्या अधिक गंभीर होत असल्याचे नागरिक सांगतात.

रस्त्याच्या कडेला माती तसेच ग्रीडचे ढिगारे असल्याने अंदाज चुकल्यास दुचाकीस्वार रस्त्याच्या बाहेरील भागाकडे घसरण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे किरकोळ अपघात घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

‘रस्ता झाला, पण सुरक्षिततेचे काम अपूर्ण’

रस्त्याचे मुख्य काम पूर्ण झाल्यानंतरही वाहनधारकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्राथमिक कामे प्रलंबित का ठेवण्यात आली आहेत, असा सवाल प्रवासी आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्यावरील धूळ आणि पांढरे पट्टे नसल्यामुळे वाहनधारकांना होणाऱ्या अडचणींकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी करण्यात आली आहे.

तातडीने पांढरे पट्टे मारण्याची मागणी

संबंधित कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने येवला-मनमाड मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पांढरे साईड पट्टे तातडीने मारावेत. तसेच रस्त्याच्या कडेला असलेले माती व इतर साहित्य हटवून वाहनधारकांसाठी सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी परिसरातील प्रवासी व ग्रामस्थांनी केली आहे.

Tags: Janardhan Jadhav
Previous Post

प्रशासनाचे दुर्लक्ष; करणवाडी-गोधनी रस्ता खड्डेमय, विद्यार्थी व नागरिक त्रस्त

Next Post

कर्तव्याच्या वर्दीत राहूनही पोलिसांनी अनुभवला गणेशोत्सवाचा आनंद

Related Posts

ताज्या घडामोडी

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
0
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण
ताज्या घडामोडी

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
3
कर्तव्याच्या वर्दीत राहूनही पोलिसांनी अनुभवला गणेशोत्सवाचा आनंद
ताज्या घडामोडी

कर्तव्याच्या वर्दीत राहूनही पोलिसांनी अनुभवला गणेशोत्सवाचा आनंद

September 27, 2026
0
ज्ञानभास्कर पुरस्कारप्राप्त राजेश माणिकराव ढोके यांचा विशेष सत्कार
ताज्या घडामोडी

ज्ञानभास्कर पुरस्कारप्राप्त राजेश माणिकराव ढोके यांचा विशेष सत्कार

September 27, 2026
8
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांना दिलासा; पुणे विद्यापीठाने मेसच्या जेवणाची प्रस्तावित दरवाढ घेतली मागे

September 27, 2026
1
नायक प्रतिष्ठानतर्फे हरिश्चंद्र तांडा शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
ताज्या घडामोडी

नायक प्रतिष्ठानतर्फे हरिश्चंद्र तांडा शाळेत मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

September 27, 2026
3
Next Post
कर्तव्याच्या वर्दीत राहूनही पोलिसांनी अनुभवला गणेशोत्सवाचा आनंद

कर्तव्याच्या वर्दीत राहूनही पोलिसांनी अनुभवला गणेशोत्सवाचा आनंद

ताज्या बातम्या

बार्शीटाकळीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश; गणेशोत्सव मिरवणुकीत सामाजिक सलोखा

September 27, 2026
कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

कुरुंदवाडमध्ये घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

September 27, 2026
कर्तव्याच्या वर्दीत राहूनही पोलिसांनी अनुभवला गणेशोत्सवाचा आनंद

कर्तव्याच्या वर्दीत राहूनही पोलिसांनी अनुभवला गणेशोत्सवाचा आनंद

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In