नळदुर्ग : प्रतिनिधी — मुंबई-हैदराबाद महामार्गालगत आपलं घर शाळेतून मुर्टी गावाकडे जाणाऱ्या स्कूल बसचा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. या अपघातात आठ विद्यार्थी जखमी झाले. जखमींना नरेंद्र महाराज रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालय, नळदुर्ग येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जखमींमध्ये पूजा साळुंके (१४), साक्षी आतकरे (१५), दूर्वा शक्ती पवार (१०), पृथ्वीराज राजकुमार चव्हाण (१०), श्रावणी वामन चव्हाण (१४), अर्पिता वामन चव्हाण (१६), आलिशा अश्फाक शेख (१५) आणि राजेश भैय्यासाहेब भालेराव (१४) यांचा समावेश आहे. सूर्यकांत गायकवाड यांनी तत्काळ रुग्णवाहिकेशी संपर्क केल्याने जखमींना वेळेत उपचार मिळाले.










