• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
September 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
मळद येथे भव्य आरोग्य शिबिर; १८९ महिला-पुरुषांची तपासणी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

श्री भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक

मळद (ता. दौंड) : प्रतिनिधी — श्री भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठान, मळदचे अध्यक्ष किशोर उर्फ दादा नवले यांच्या संकल्पनेतून तसेच उद्योजक अजय म्हेत्रे यांच्या सहकार्याने भैरवनाथ मंदिरासमोर भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मळदच्या सरपंच सौ. रूपाली चंद्रकांत दुधे यांच्या हस्ते करण्यात आले.

RelatedPosts

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

या शिबिरात तब्बल १८९ महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच आरोग्य तपासणी व औषधोपचाराची सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत केले. शिबिरासाठी हेल्प इंडिया संस्थेने सहकार्य केले.

श्री भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून मळद गावात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी गावातील स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

किशोर उर्फ दादा नवले यांनी ‘न्यू किशोर इलेक्ट्रिकल’ या व्यवसायाच्या माध्यमातून यशस्वी वाटचाल करताना सामाजिक कार्यालाही प्राधान्य दिले आहे. “गावासाठी अनेक योजना मनात आहेत. त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न असून, मळद गावाने महाराष्ट्रासह देशाच्या नकाशावर वेगळी ओळख निर्माण करावी, ही इच्छा आहे,” असे त्यांनी सांगितले.

आरोग्य शिबिरासह विविध सामाजिक उपक्रमांमुळे मळद गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, श्री भैरवनाथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या कार्याचे ग्रामस्थांसह विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

Tags: Bapu Nawle
Previous Post

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

Next Post

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

Related Posts

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडची २३ वी वार्षिक सभा व भव्य शेतकरी मेळावा उत्साहात

September 28, 2026
0
उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार
ताज्या घडामोडी

उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणुकीबद्दल दादासो कृष्णा भागवत यांना कृषी भूषण पुरस्कार

September 28, 2026
2
घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी
ताज्या घडामोडी

घुंगराळा येथे पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर करण्याची मागणी

September 28, 2026
3
ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक
ताज्या घडामोडी

ऊस दरवाढीसाठी खुदावाडी येथे शेतकऱ्यांची बैठक

September 28, 2026
0
नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी
ताज्या घडामोडी

नळदुर्गजवळ स्कूल बस पलटी; आठ विद्यार्थी जखमी

September 28, 2026
2
शेवरे गावात एसआयआरच्या पार्श्वभूमीवर बीडीओ पथकाकडून पाहणी
ताज्या घडामोडी

शेवरे गावात एसआयआरच्या पार्श्वभूमीवर बीडीओ पथकाकडून पाहणी

September 28, 2026
7
Next Post
आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

आई गावदेवी फायटरकडून श्रमदानातून पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले

ताज्या बातम्या

माहूर तालुक्यात संकटांची मालिका; दुष्काळ, बेरोजगारी आणि प्रशासकीय तक्रारींनी नागरिक त्रस्त

September 28, 2026
तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

तरुणांनो, डीजेच्या आवाजापेक्षा तुमच्या भविष्याचा आवाज मोठा करा!

September 28, 2026
चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

चाकातीर्थ नदीचा जलसाठा आटत चालला; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती

September 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In