ता. प्रतिनिधी केशव आमले.
सेवा संकल्प अभियानांतर्गत दि. ९ ऑक्टोंबर रोजी कळमनुरी येथील बस स्थानक परिसरात विशेष
पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते या पथनाट्याच्या माध्यमातून शासनाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती व सामाजिक जनजागृती संदेश जनतेला देण्यात आले पथनाट्यामधील सहभागी कलाकारांनी
स्पष्टपणे सादरीकरण करून समाज प्रबोधनाचा संदेश दिला तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेला देऊन जनजागृती केली यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोडगे भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजाननराव घुगे विधानपरिषद आमदार प्रजाताई सातव राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे पुत्र शशिकांत वडकुते ओबीसी जिल्हा अध्यक्ष तसेच जिल्हा सरचिटणीस उमेश जी सोमानी कळमनुरी मंडळाध्यक्ष ओमकार नावडे विठ्ठल राव भोयर राहुल मिनी तसेच मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.










