• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सिंदेवाहीत तिघांचे बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 25, 2026
in Blog
0
सिंदेवाहीत तिघांचे बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

रस्ता अपघातातील गंभीर दुखापतींमुळे नागपूरच्या उपचार केंद्रात प्राणज्योत मालवली; परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

सिंदेवाही (जि. चंद्रपूर) | प्रतिनिधी :

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील पळसगाव (जाट) आणि परिसरात गेल्या महिनाभरापासून धुमाकूळ घालून तीन शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ या उपप्रौढ नर वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नागपूर-सिंदेवाही महामार्गावर झालेल्या रस्ता अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर वनविभागाने त्याला बेशुद्ध करून नागपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये (TTC) दाखल केले होते. चार दिवसांच्या उपचारांनंतरही २३ नोव्हेंबर रोजी रात्री ८.४० वाजता या वाघाची प्राणज्योत मालवली.

RelatedPosts

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव

जळका फाट्यावर भीषण अपघात; दुचाकीला कारची धडक, महिलेचा जागीच मृत्यू

तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ; पंढरपुरात विवाह सोहळ्यांची लगबग वाढणार

या वाघाचे वय अंदाजे २ ते २.५ वर्षे होते. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजता उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास, सहायक वनसंरक्षक यश काले, मानद वन्यजीव रक्षक तसेच गोरेवाडा आणि टीटीसीच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले.

भरधाव वाहनाच्या धडकेमुळे वाघाच्या पुढील आणि मागील पायांमध्ये अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते. तसेच शरीरात मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्राव झाला होता. रक्ताची तीव्र कमतरता निर्माण झाल्याने वाघाला ‘हायपोव्होलेमिक शॉक’ बसला आणि त्यातून त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे.

शवविच्छेदनानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाघावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वाघाच्या मृत्यूमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Ad 1
Previous Post

जळका फाट्यावर भीषण अपघात; दुचाकीला कारची धडक, महिलेचा जागीच मृत्यू

Next Post

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार नितीन देशमुख सरसावले

Related Posts

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव
Blog

14
तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ; पंढरपुरात विवाह सोहळ्यांची लगबग वाढणार
Blog

तुळशी विवाहानंतर लग्नसराईला प्रारंभ; पंढरपुरात विवाह सोहळ्यांची लगबग वाढणार

November 25, 2026
0
सामान्य कुटुंबातील कन्येचा नैताळे ग्रामस्थांकडून जंगी सन्मान
Blog

सामान्य कुटुंबातील कन्येचा नैताळे ग्रामस्थांकडून जंगी सन्मान

November 24, 2026
18
कुरुंदवाड पोलिसांची रस्ता सुरक्षेसाठी धडक मोहीम; ५५ वाहनांवर कारवाई, ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल
Blog

कुरुंदवाड पोलिसांची रस्ता सुरक्षेसाठी धडक मोहीम; ५५ वाहनांवर कारवाई, ४० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

November 23, 2026
58
आळंदीत आगरी समाज धर्मशाळेची भव्य वास्तू उभारणार; २५ नोव्हेंबरला जीर्णोद्धाराचे भूमिपूजन
Blog

आळंदीत आगरी समाज धर्मशाळेची भव्य वास्तू उभारणार; २५ नोव्हेंबरला जीर्णोद्धाराचे भूमिपूजन

November 23, 2026
11
Next Post
संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार नितीन देशमुख सरसावले

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार नितीन देशमुख सरसावले

ताज्या बातम्या

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव

कर्तव्यनिष्ठा आणि त्यागाची आदिवासी ‘हिरकणी’! सौ. सरिता शिद यांना ‘उत्कृष्ट शिक्षक’ पुरस्काराने गौरव

November 25, 2026
संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार नितीन देशमुख सरसावले

संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आमदार नितीन देशमुख सरसावले

November 25, 2026
सिंदेवाहीत तिघांचे बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू

सिंदेवाहीत तिघांचे बळी घेणाऱ्या ‘T-84 SM’ वाघाचा उपचारादरम्यान मृत्यू

November 25, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In