विधिवत घटस्थापना व माता पूजन; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या रेणुका माता देवस्थानात विधिवत घटस्थापना करून शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. यावेळी सालाबादप्रमाणे माता पूजन करण्यात आले. परिसरातील असंख्य भाविकांनी देवस्थानात उपस्थित राहून रेणुका मातेचे दर्शन घेतले.
नवरात्रोत्सवाच्या प्रारंभानिमित्त देवस्थानात धार्मिक विधी पार पडले. घटस्थापनेनंतर भाविकांनी मातेचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. रेणुका मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मनोभावे पूजा-अर्चा करून सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली.
रेणुका माता देवस्थानातील शारदीय नवरात्रोत्सवामुळे एमआयडीसी परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.











