लेखक उदय गणपत जाधव यांच्या नाट्यलेखनाचा गौरव; यापूर्वी जयंत पवार पुरस्कारानेही सन्मानित
श्री संत कीसन महाराज सुडके आश्रमातर्फे आयोजित राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कारासाठी लेखक उदय गणपत जाधव यांच्या ‘गार्गी आणि इतर एकांकिका’ या संग्रहाची निवड करण्यात आली आहे. नाट्यवाङ्मय विभागात या संग्रहाला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने जाधव यांच्या साहित्यिक कार्याचा पुन्हा एकदा गौरव झाला आहे.
महाराष्ट्रभरातून प्राप्त झालेल्या विविध साहित्यकृतींचे परीक्षण केल्यानंतर निवड समितीने राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये नाट्यवाङ्मय विभागातून उदय गणपत जाधव यांच्या ‘गार्गी आणि इतर एकांकिका’ या संग्रहाची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
उदय गणपत जाधव यांना यापूर्वी जयंत पवार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आता राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
जाधव यांच्या लेखनाची राज्यस्तरावर पुन्हा एकदा दखल घेतली गेल्याने साहित्य क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.









